Share

मराठमोळी तेजस्वी प्रकाश बनली ‘बिग बॉस १५’ ची विजेती; ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रक्कम

Tejasswi Prakash Won The Bigg Boss Show 15

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १५ व्या सीझनचा महाअंतिम सोहळा रविवारी दिमाखात पार पडला. यावेळी बिग बॉसच्या घरातील प्रतीक सहजपाल, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे सदस्य टॉप ३ मध्ये पोहोचले होते. तर या स्पर्धकांपैकी मराठमोळी तेजस्वी प्रकाश बिग बॉसची ट्रॉफी (Tejasswi Prakash Won The Bigg Boss Show 15) आपल्या नावे केली आहे. तर प्रतीक सहजपाल शोचा उपविजेता ठरला आहे.

‘बिग बॉस १५’ च्या अंतिम सोहळ्यापूर्वी सोशल मीडियावर सातत्याने अशा बातम्या समोर येत होत्या की, यंदाच्या सीझनचा विजेता प्रतीक सहजपालच होणार. त्यानुसार प्रतीक सहजपाल टॉप २ मध्ये सुद्धा पोहोचला होता. परंतु, तेजस्वी आणि प्रतीक यांच्यात मोठी टक्कर होती. चुरशीच्या या स्पर्धेत शेवटी प्रतीकला हरवून तेजस्वी बिग बॉसची विजेती बनली.

‘बिग बॉस’ शो तेजस्वीसाठी खूपच लकी ठरला. शो जिंकल्यानंतर तिला बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत ४० लाख रूपये रक्कम देण्यात आले. एवढेच नाही तर तिला ‘नागिन ६’ मध्ये काम करण्याचा ऑफरसुद्धा मिळाला. बिग बॉस शो जिंकल्यानंतर तेजस्वीनीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला. यामध्ये ती बिग बॉसची ट्रॉफी आणि तिच्या आईवडिलांसोबत फोटो काढताना दिसली.

या फोटोसोबतच तेजस्विनीने तिला पाठिंबा देणाऱ्या आणि तिला जिंकवणाऱ्या सर्वांचे आभार मानले. तेजस्वीच्या या पोस्टनंतर तिच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही तिच्या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत.

तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. तिने कलर्स वाहिनीवरील ‘स्वरागिनी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या शोमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली. याशिवाय ती ‘पहरेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का २’, ‘संस्कार धरोहर की’ यासारख्या मालिकेत काम केले.

यासोबतच ती रोहित शेट्टी यांच्या ‘खतरों के खिलाडी’ शोच्या १० व्या सीझनमध्ये दिसली होती. या शोमध्ये ती विजेता होऊ शकली नाही. मात्र, ‘खतरों के खिलाडी’ नंतर ती ‘बिग बॉस’ शोमध्ये सहभागी झाली आणि ती या शोची विजेती बनली.

दरम्यान, बिग बॉसच्या घरातील निशांत भट्ट हा स्पर्धक टॉप ५ मध्ये पोहोचला होता. मात्र, महाअंतिम सोहळ्यावेळी तो १० लाख रूपये घेऊन विजेत्याच्या स्पर्धेतून बाहेर पडला. यामुळे त्याचे चाहते थोडेसे नाराजही झाले. कारण चाहते त्याला बिग बॉस शोच्या विजेत्याच्या रूपात पाहू इच्छित होते.

महत्त्वाच्या बातम्या :
Bigg Boss 15 Finale : बिग बॉस फिनालेच्या अगोदरच लीक झाले विजेत्याचे नाव? फोटो होतोय व्हायरल
नथूराम गोडसे मर्द असता तर महात्मा गांधीऐवजी जिनाला गोळी घातली असती – शिवसेना
अभिनेत्री काजोल देवगन कोरोनाच्या विळख्यात; मुलीला मिस करत शेअर केली पोस्ट

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now