Share

केसीआर यांच्या बैठकीला आदित्य ठाकरेंच्या जागी तेजस ठाकरेंनी लावली हजेरी

सध्या देशभरात पाच राज्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष आपापली रणनीती ठरवण्यात व्यस्त आहेत. यात शिवसेना देखील आता राज्याबाहेर आपली ताकद आजमावून पाहत आहे. विशेष म्हणजे, यावेळी उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे यांची देखील बरीच चर्चा होताना दिसते. काही घडामोडींकडे पाहता तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात सहभागी होतील,अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, तेलंगणा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, यावेळी तेजस ठाकरे यांची या भेटीतील उपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यामुळे तेजस ठाकरे सक्रीय राजकारणात सहभागी होतील का? या चर्चेला उधाण उधाण आलं आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुंबईत दाखल झाले होते. यावेळी, चंद्रशेखर राव आणि त्यांचे सहकारी यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री यांनी त्यांच्या निवासस्थानी या सर्वांच्या जेवणाची सोय देखील केली होती.

यावेळी, मुख्यमंत्री ठाकरे आणि चंद्रशेखर यांच्यात वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, या बैठकीत उद्धव ठाकरे यांचा आपला लहान चिरंजीव तेजस ठाकरे यानं देखील आपली उपस्थिती लावली होती. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाची चंद्रशेखर राव यांना ओळख करून दिली.

तेजस ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांच्याशी बराच वेळ संवाद देखील साधला. तेजस ठाकरे यांनी यावेळी, त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामाचा लेखाजोखा चंद्रशेखर यांना दिला. आत्तापर्यंत केलेल्या आपल्या वेगवेगळ्या संशोधन आणि कार्याबद्दलची माहिती चंद्रशेखर यांना दिली.

याआधी उध्दव ठाकरे यांच्या सोबत नेहमीच आदित्य ठाकरे दिसत होते, मात्र यावेळी आदित्य ठाकरे यांच्या जागी तेजस ठाकरे या बैठकीत दिसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. दरम्यान, एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे साताऱ्यात हजर आहेत, त्यामुळे त्यांची जागा आज तेजस ठाकरे यांनी भरून काढली. तेजस यांच्या या बैठकीतील उपस्थितीमुळे आता ठाकरे यांचा हा मुलगा देखील राजकारणात सहभागी होणार का याची चर्चा होत आहे.

राजकारण

Join WhatsApp

Join Now