(IND vs SL) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना अतिशय रोमांचक होता. नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली.
फलंदाजांच्या धडाकेबाज कामगिरीनंतर यजमानांनी 7 गडी गमावून 374 धावांचे लक्ष्य ठेवले, जे श्रीलंकेच्या संघाला गाठण्यात अपयश आले. परिणामी रोहित शर्मा अँड कंपनीने 67 धावांनी विजय मिळवला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यात शतकी भागीदारी झाली. या दोन्ही खेळाडूंनी अर्धशतकी खेळीमध्ये पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली. पण शनाकाने गिलला बाद करून ही जोडी फोडली.
यानंतर शर्मा ८३ धावा करून बाद झाला. गिल बाद झाल्यानंतर विराटने तिसऱ्या क्रमांकावर येत शतक झळकावले. त्याचवेळी दुसऱ्या टोकाला विकेट पडण्याची मालिका सुरूच होती. श्रेयस अय्यर 28, केएल राहुल 39 आणि हार्दिक पंड्या 14 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतले.
याशिवाय अक्षर पटेललाही केवळ 9 धावा करता आल्या. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती पण विराटची विकेट गमावल्यानंतर टीम इंडीया शेवटी कोसळताना दिसली. तो बाद झाल्यानंतर भारताच्या स्कोअरमध्ये केवळ 10 धावांची भर पडू शकली.
विराटच्या शतकासमोर शनाकाची झंझावाती खेळी व्यर्थ ठरली आणि भारताने श्रीलंकेचा ६७ धावांनी धुव्वा उडवला. विराट रोहीतसह उमराण मलिक हा नवखा खेळाडू ठरला टिम इंडीयाच्या दणदणीत विजयाचा खरा शिल्पकार. त्याने महत्वपुर्ण तीन बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
या सामन्यात (IND vs SL) विराट कोहली उत्कृष्ट लयीत दिसला. 20 व्या षटकात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना त्याने 87 चेंडूत 113 धावा केल्या. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार होता. तो फलंदाजीसाठी क्रिजवर आला तेव्हा संघाची धावसंख्या 143 धावा होती. त्याचवेळी तो बाद झाला तेव्हा संघाच्या धावफलकावर 364 धावा होत्या.
या डावात त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 73 वे शतक झळकावले, तर हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 45 वे शतक होते. क्रिकेटच्या 50 षटकांच्या फॉरमॅटमधील हे त्याचे सलग दुसरे शतक ठरले.
यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. त्याच्या शतकी खेळीमुळे टीम इंडियाने 374 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात श्रीलंका संघाची सुरुवात चांगली झाली नाही.
पॉवरप्ले संपण्यापूर्वी संघाने अविष्का फर्नांडो (5) आणि कुसल मेंडिस (0) यांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर चरिथ अस्लंकाही वैयक्तिक 23 धावांवर बाद झाला. मात्र, सलामीवीर पथुम निसांका बराच वेळ क्रीजवर थांबला.
त्याने अर्धशतकी खेळी खेळताना 72 धावा जोडल्या. त्याचवेळी धनंजया डी सिल्वा आणि वानिंदू हसरंगा यांना अनुक्रमे 47 आणि 16 धावाच करता आल्या. दुनिथ वेलल्गेही खाते उघडू शकला नाही. त्यानंतर चमिका करुणारत्ने केवळ 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दासुन शनाकाने विकेट पडणे थांबवले आणि १०८ धावांची शानदार नाबाद खेळी खेळली. मात्र त्याची शतकी खेळीही संघाला जिंकू शकली नाही आणि भारताने 67 धावांनी विजय मिळवला.
श्रीलंकेचे गोलंदाज भारतीय फलंदाजांवर निष्प्रभ दिसत असताना (IND vs SL), टीम इंडियाच्या गोलंदाजांनी विरोधी संघाच्या फलंदाजांना लवकर बाद करत जोरदार मुसंडी मारली. त्याचवेळी मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक श्रीलंकेच्या संघावर तुटून पडले.
पण एकाही भारतीय गोलंदाजाला कर्णधार दासूनची विकेट घेता आली नाही, ज्यामुळे त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले.
वास्तविक, पॉवरप्लेपूर्वीच सिराजने संघाला दोन यश मिळवून दिले. त्याचबरोबर उमरानने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अक्षर पटेल हा एकमेव गोलंदाज होता ज्याला यश मिळवता आले नाही.
महत्वाच्या बातम्या
रोहीतने DRS घेण्यास नकार देताच प्रचंड चिडला शुभमन गिल; रोहीतला शिवीगाळ करत गेला डगआऊटमध्ये
हार्दिक पांड्याला चढला कर्णधारपदाचा माज, LIVE मॅचमध्ये विराटसोबत केले असे काही, पाहून तुम्हाला बसेल धक्का
“हा तर सचिनचा पण बाप निघाला”; विराटने 73 वे शतक झळकावताच चाहत्यांनी दिल्या अतरंगी प्रतिक्रिया