भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र श्रीलंकेच्या फलंदाजांनी वेगवान फलंदाजी करताना टीम इंडियाला 207 धावांचे लक्ष्य दिले.
टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. सूर्या आणि अक्षरने सामना जिंकण्याच्या आशा उंचावल्या. सूर्या बाद झाल्यानंतर शिवम मावी क्रीजवर आला आणि त्याने झंझावाती पद्धतीने चेंडू सीमापार नेला. मावीच्या शानदार फलंदाजीवर कर्णधार आणि उपकर्णधार दोघांनीही उभे राहून त्याचे कौतुक केले.
भारतीय संघ हा सामना जिंकू शकला नसता, पण संघासाठी दुसरा टी-20 सामना खेळणाऱ्या शिवम मावीला फलंदाजीची संधी मिळाली, त्यामुळे त्याने शानदार फलंदाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
सूर्यकुमार बाद झाल्यानंतर संघाच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या होत्या, मात्र शिवमने (शिवम मावी) धडाकेबाज फलंदाजी करत चाहत्यांना आनंद दिला. यानंतर अक्षरने सूर्यासोबत अप्रतिम भागीदारी रचली, तरी त्याचा प्रयत्न भारताला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
16व्या षटकात फलंदाजीला आलेल्या शिवम मावीने 6 चेंडूत केवळ 6 धावा केल्या होत्या. पण मधुशंकाच्या शेवटच्या षटकात त्याने सतत चौकारांचा वर्षाव केला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला. यानंतर, त्याने पुढच्याच चेंडूवर चौकार मारला.
नंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक गगनचुंबी षटकार मारला, हे पाहून हार्दिक पांड्या आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी उभे राहून त्याचे कौतुक केले. तर तिथे सूर्यकुमार यादव यांनी डोके टेकवून अभिवादन केले. सूर्यकुमार यादवनेही ५१ धावांचे धडाकेबाज अर्धशतक झळकावले. डावाची सुरुवात करताना इशान किशनला केवळ 2 धावा तर शुभमन गिलला 5 धावा करता आल्या.
आज, 5 जानेवारी रोजी, टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी केली. हार्दिकचा हा निर्णय खूपच निराश करणारा होता.
पथुम निशांकने 33 धावा करत चांगली सुरुवात करून दिली, कुसल मेंडिसने 31 चेंडूत 52 धावा केल्या आणि शेवटी कर्णधार शनाकाने 22 चेंडूत 56 धावा करत 206 धावांचा डोंगर उभा केला.
टीम इंडियाने 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इशान किशन आणि शुभमन गिल यांना पाठवले, पण दोन्ही खेळाडूंनी स्वस्तात विकेट गमावल्या. राहुल त्रिपाठीही तिसऱ्या क्रमांकावर विशेष काही करू शकला नाही. राहुल त्रिपाठी 5 धावा करून बाद झाला.
त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी 40 चेंडूत 91 धावांची भागीदारी करून विजयाच्या आशा उंचावल्या, पण अखेरीस शिवम मावीच्या 26 धावांच्या खेळीनंतरही 16 धावांनी सामना गमवावा लागला. अखेरच्या षटकात 21 धावांची गरज असताना टीम इंडियाला केवळ 4 धावा करता आल्या.
महत्वाच्या बातम्या
सूर्या-अक्षरची झंझावाती खेळी व्यर्थ; कर्णधार हार्दिकच्या ; घोडचुकीमुळे टिम इंडियाचा पराभव
शरीरावर एकही कपडा उरला नव्हता भूमी पेडणेकरने सांगीतला इंटिमेट सीन करतानाचा भयानक अनुभव
रोहीत शर्माची संघातून हकालपट्टी; हार्दिक नवा कर्णधार तर सूर्या उपकर्णधार