टीम इंडियाचा (Team India) एक मजबूत खेळाडू, जो एकेकाळी टीमची सर्वात मोठी ताकद होता, आता तो भारतीय संघाची सर्वात मोठी कमजोरी बनला आहे. हा खेळाडू एकेकाळी टीम इंडियासाठी हिरो ठरला होता, मात्र आता तो टीम इंडियासाठी खलनायक ठरत आहे. हा खेळाडू टीम इंडियासाठी ओझ ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत या खेळाडूच्या खराब कामगिरीमुळे भारताने सलग दोन सामने गमावले आहेत.(Team India, Kheladi, Oz, Yujvendra Chahal)
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताला ४ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासाठी लेगस्पिनर युजवेंद्र चहल सर्वात जास्त जबाबदार आहे. या सामन्यात युझवेंद्र चहलने आपल्या कोट्यातील ४ ओवरमध्ये ४९ धावा दिल्या. या काळात युझवेंद्र चहलचा इकॉनॉमी रेट १२.२० होता. या खराब कामगिरीमुळे पुढील सामन्यात युझवेंद्र चहलला काढून टाकणार असल्याचे दिसत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातही युझवेंद्र चहल चांगलाच महागात पडला. युझवेंद्र चहलने पहिल्या टी-२० मध्ये २.१ ओवरमध्ये २६ धावा दिल्या होत्या. या काळात युझवेंद्र चहलचा इकॉनॉमी रेट १२ वर होता. सलग दोन सामन्यांतील या खराब कामगिरीनंतर युझवेंद्र चहलला भारतीय संघात स्थान मिळणार नाही. लेगस्पिनर रवी बिश्नोई युझवेंद्र चहलच्या जागी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान घेण्यास पात्र आहे.
युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर आफ्रिकन फलंदाजांनी जोरदार धुव्वा उडवला. युझवेंद्र चहल आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याच्या लायकीचा नाही. युझवेंद्र चहलने भारताकडून ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०४ विकेट्स आणि ५६ टी-२० सामन्यांमध्ये ६९ बळी घेतले आहेत.
भारतीय संघात युझवेंद्र चहलसारखा मजबूत फिरकी गोलंदाज आहे, जो त्याची जागा घेऊ शकतो. तो म्हणजे रवी बिश्नोई, जो सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. त्याचे लहरी चेंडू खेळणे कोणासाठीही सोपे नाही. रवी बिश्नोई खूप वेगाने चेंडू हवेत फेकतो, त्यामुळे कोणत्याही फलंदाजाला फटका मारण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही.
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: जॉस बटलर आणि युझवेंद्र चहल धनश्रीकडून घेत आहेत डान्सचे धडे, चाहत्यांना देणार सरप्राईज
मी नाही, तर हे आहे युझवेंंद्र चहलचे पहिले प्रेम; स्वत: धनश्री वर्मानेच केला मोठा खुलासा
एकमेकांना मिठी मारत खुल्लम खूल्ला प्रेम करताना दिसले युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा, बघा व्हायरल फोटो
अनोळखी मुलीला चहलने केला असा मेसेज, मुलीने ऍक्शन घेताच मागावी लागली माफी, वाचा सविस्तर..