Share

मालिका जिंकल्यावर रोहितने ‘या’ वृद्ध व्यक्तीकडे दिली ट्रॉफी; पहा भारताच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ

न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 अशी जिंकून भारतीय संघाने आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे. किवी संघ भारताच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना तीन सामन्यांची वनडे आणि टी-२० मालिका खेळायची आहे.

त्याचवेळी, 18 जानेवारीपासून सुरू झालेल्या एकदिवसीय मालिकेत यजमानांनी ब्लॅक कॅप्सचा 3-0 असा व्हाईटवॉश केला. या विजयानंतर टीम इंडियाचे खेळाडू खूप खूश झाले आणि विजयाचा आनंद साजरा करताना दिसले.

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवताना दिसला. पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात संघाने अनुक्रमे 12 धावा आणि 8 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला.

त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी किवी संघाचा 90 धावांनी पराभव करत भारताच्या खात्यात आणखी एक विजय जमा केला. मालिका आणि तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर खेळाडू खूप आनंदात होते. शेवटचा सामना संपल्यावर संघातील सर्व खेळाडू एकमेकांना मिठी मारून हस्तांदोलन करताना दिसले.

त्याचवेळी ट्रॉफी मिळाल्यानंतर रोहित लहान मुलासारखा धावताना दिसला आणि त्यानंतर त्याने ती ट्रॉफी केएस भरतकडे सोपवली. संघाच्या सेलिब्रेशनदरम्यान, कॅप्टन रोहित शर्माने विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये सपोर्ट स्टाफमधील एका वयस्कर सदस्याला उदारपणे सामील करून घेतले.

https://twitter.com/BCCI/status/1617911045703729152?s=20&t=S5JnFyXXJnWzuqVozvYPUw

शेवटी सर्व खेळाडूंनी फोटोसाठी पोझ दिली. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

https://twitter.com/BCCI/status/1617919243290574848?s=20&t=uW8UTEaZAPQd3nDmVTX-Tg

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका समाप्त झाली आहे. या मालिकेतील शेवटचा सामना २४ जानेवारी रोजी होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर येथे खेळला गेला. रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांमुळे मेन इन ब्लूने 9 विकेट गमावून 386 धावांचे लक्ष्य ठेवले.

प्रत्युत्तरात दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात चांगली झाली. असे असूनही, पाहुण्या संघाला विजयाची नोंद करता आली नाही आणि केवळ 295 धावा करता आल्या. परिणामी भारताने 90 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने ३ सामन्याच्या मालिकेतील सगळे सामने जिंकले.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणार्‍या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने शतकी डावात पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी केली. भारताच्या या जोडीने पॉवरप्लेमध्ये 82 धावांची भर घातली, त्यानंतर त्यांना रोखणे किवी संघासाठी खूप कठीण झाले.

हे ही वाचा
स्वतःच चूक करून ईशानने विराटवर काढला राग, बाद होताच भर मैदानात कोहलीला केली शिवीगाळ; पहा व्हिडिओ
रोहित-गिलच्या धडाक्यानंतर गोलंदाजांनी ओकली आग, किवींचा धुव्वा उडवत भारत बनला नंबर वन
द्रारिद्यात जन्मलेल्या धीरेंद्रशास्त्रींची संपत्ती किती आहे माहितीये का? महिन्याच्या कमाईचा आकडा ऐकून धक्का बसेल

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now