दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यामुळे आता भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद कोणाकडे जाणार याची चर्चा रंगू लागली आहे. भारतीय एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सध्या रोहित शर्माकडे आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी के एल राहुलला कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.
त्यामुळे भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत रोहित शर्मा, के एल राहुल आणि ऋषभ पंत हे खेळाडू आहेत. पण याव्यतिरिक्त आणखी एक खेळाडूने कसोटी संघाच्या कर्णधारपदावर दावा ठोकला आहे. भारतीय जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आपण कसोटी संघाचा कर्णधार बनण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहची उपकर्णधारपदी निवड झाली आहे. सोमवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला की, मी कोणत्याही प्रकारचे आव्हान स्विकारण्यास तयार आहे. जर कसोटी संघाचे कर्णधारपद मला दिले गेले, तर माझ्यासाठी तो मोठा सम्मान असेल.
“मला वाटत नाही की कोणताही खेळाडू कर्णधार पदाच्या जबाबदारीला नकार देईल. मीही त्याला अपवाद नाही. माझ्या क्षमतेनुसार यासाठी मला नेहमीच योगदान द्यायचे आहे. जबाबदारी घेणे आणि सहकाऱ्यांना मदत करणे ही माझी नैसर्गिक गुणवत्ता आहे”, असे देखील जसप्रीत बुमराह त्या पत्रकार परिषदेत म्हणाला.
विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्यावर बुमराह म्हणाला की, ‘हा त्याचा वैयक्तीक निर्णय आहे आणि मी त्याचा सम्मान करतो. मी विराटच्या नेतृत्वाखाली पहिली कसोटी खेळली होती. विराटने त्याचा निर्णय टीम मिटिंगमध्ये सांगितला होता. त्यानंतर हा निर्णय सार्वजनिक केला.’ १९ जानेवारीपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.
एकदिवसीय मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झालेला जलद गोलंदाज मोहम्मद सिराज आता पूर्णपणे फिट झाला आहे. तो भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान सिराज दुखापतग्रस्त झाला होता.
महत्वाच्या बातम्या :-
बळी देताना बोकडाऐवजी बोकड पकडणाऱ्या व्यक्तीचीच मान छाटली; जागीच तडफडून मृत्यू
‘विराट कोहलीला हटवण्यास गांगुलीच जबाबदार’; दिग्गज खेळाडूने उघडली बीसीसीआयची पोल
कोहलीचा गेम करून गांगुलीने भारतीय क्रिकेटलाच हादरा दिला; दिग्गज क्रिकेटपटूचे गंभीर आरोप