Share

आई शेळ्या-म्हशी पाळून चालवायची घर, शिक्षकांनी केली मदत; विशालने UPSC क्रॅंक करत साकारले स्वप्न

असे म्हणतात की, ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ (जे प्रयत्न करतात त्यांना यश नक्कीच मिळते) ही म्हण मुझफ्फरनगरच्या विशालने खरी करून दाखवली आहे. UPSC ने २०२१ च्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे आणि विशालने सर्व अडचणींना न जुमानता या परीक्षेत यश मिळवले आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील विशालने यूपीएससीमध्ये ४८४ वा क्रमांक पटकावला आहे. ज्याप्रकारच्या कठीण परिस्थितीत विशालने हे यश संपादन केले ते कोणासाठीही प्रेरणादायी ठरू शकते.(Vishal, Gauri Shankar Prasad, UPSC)

या यशाचे सर्वात मोठे श्रेय विशाल त्याचे शिक्षिक गौरी शंकर प्रसाद यांना देतो. विशालने सांगितले की, माझ्या शिक्षकांनीच मला कठीण परिस्थितीतही यूपीएससीची तयारी करण्यास प्रेरित केले. त्यांनी माझ्या शिक्षणाची फी भरली. माझ्या अभ्यासात जेव्हा जेव्हा मला पैशाची समस्या यायची तेव्हा गौरी शंकरजी मला त्यांच्या घरी बोलावत. एवढेच नाही तर मला नोकरी लागल्यावर गौरी शंकरजींनी मला नोकरी सोडून यूपीएससीची तयारी करण्यास सांगितले. माझ्या संघर्षाच्या दिवसात त्यांनी मला प्रत्येक वळणावर मदत केली

विशाल हा मीनापूर, मुझफ्फरपूरमधील मकसूदपूर गावचा असून, विशालच्या वडिलांचे २००८ मध्ये निधन झाले. वडील मोलमजुरी करून घर सांभाळायचे. मात्र वडिलांच्या निधनानंतर आई रीना देवी यांनी कसे तरी घर सांभाळले. विशालची आई रीना देवी शेळ्या-म्हशी पाळून घर चालवत होत्या.

विशाल सांगतात की, माझ्या आईने मला माझ्या वडिलांची उणीव कधीच जाणवू दिली नाही.  वडिलांची आठवण करून देताना विशाल म्हणाला की, ते मला नेहमी सांगायचे की एक दिवस मी अभ्यास करून लिहून मोठा माणूस होईन. आज विशालने वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याने त्याचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

विशालने २०११ मध्ये १०वीच्या परीक्षेत टॉप केला होता. २०१३ मध्ये, विशालने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला आणि २०१७ मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर रिलायन्समध्ये काम करण्यास सुरुवात केली. विशालने सांगितले की, तो नोकरी करत असताना माझे शिक्षिक गौरी शंकर यांनी मला नोकरी सोडून यूपीएससीची तयारी करण्यास सांगितले.

नोकरी सोडल्यानंतर माझ्या शिक्षकांनी मला आर्थिक मदत केली. विशालने आपल्या मेहनतीच्या जोरावर अखेर हे यश मिळवले. या यशानंतर विशालच्या कुटुंबीयांना खूप आनंद झाला आहे. दुसरीकडे, गौरी शंकर सांगतात की, विशाल पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता आणि त्याच्या मेहनतीचे फळ आहे की त्याला आज हे यश मिळाले आहे.

महत्वाच्या बातम्या-
यूपीएससी टॉपर टीना डाबी अडकली विवाहबंधनात, बाबासाहेबांचा फोटो पाहून सर्वांनी केले कौतुक 
IPS होऊनही असमाधानी, ओंकार पुन्हा परीक्षेला बसला अन् मुलाचं यश भावून आईही भावुक झाली
खुपच डॅशिंग आणि सुंदर आहे ही महिला IPS; तिची झलक पाहून दिग्दर्शकाने दिली होती चित्रपटात काम करण्याची ऑफर
पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव

ताज्या बातम्या शिक्षण

Join WhatsApp

Join Now