स्वातंत्र्यदिनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ स्टेटस ठेवणाऱ्या शिक्षकाला ठोकल्या बेड्या; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो. त्यावेळी कोल्हापुरातील एका शिक्षकाने पाकिस्तान जिंदाबादचे स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवर ठेवल्याने सर्वांना धक्काच बसला. (Teacher shackled for holding ‘Pakistan Zindabad’ status on Independence Day)

आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत- पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण आहेत. तसेच दोन देशांमध्ये अनेकदा लहान- मोठ्या गोष्टींवरून तणाव निर्माण होत असतो. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील एका शाळेच्या शिक्षकाने अशा प्रकारे वर्तन केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे राहणाऱ्या जावेद अहमद या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. हा शिक्षक मूळचा जम्मूचा असल्याची माहिती आहे.

कोल्हापुरातील एका खाजगी शाळेत जावेद अहमद हा शिक्षक नोकरी करत होता. त्याने १४ ऑगस्ट रोजी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे स्टेटस ठेवले. ते त्याच्या इतर सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांना दिसले. त्यानंतर सगळेच हैराण झाले.

या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून शाळेतून त्याला हाकलून देण्यात आले आहे. यापूर्वीही या शिक्षकाने ५ ऑगस्ट रोजी कशी ‘जम्मू-काश्मीर ब्लॅक डे’ असं स्टेटस आपल्या व्हॉट्सअपवर ठेवलं होतं.

मात्र त्यावेळी इतरांनी ते स्टेटस पाहून त्याकडे दुर्लक्ष केलं. पण आता ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे स्टेटस पाहून मात्र सगळ्यांनी त्याची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर पोलिसांनी या शिक्षकावर तातडीने कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
जोपर्यंत तुम्हाला एकट्याने वेळ घालवायची वेळ येणार नाही, तोपर्यंत… असं म्हणत रतन टाटांनी म्हातारपणाच्या दुःखाला वाट करून दिली
‘त्या सीसीटीव्हीत बरेच काही सापडेल’; मेटे यांच्या ड्रायव्हरने केला मोठा खुलासा
आज ११ वाजता जिथे असाल तिथे उभे राहा आणि…; शिंदे सरकारचा राज्यातील नागरिकांना आदेश