इंडोनेशियामधील धार्मिक बोर्डिंग स्कूलमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इस्लामिक शाळेतील एका शिक्षकाने तब्बल 13 विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिक्षकाने केलेल्या या घाणेरड्या कृत्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले असून त्यांच्या माहितीनुसार आता या शिक्षकाला न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सुरुवातीला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. परंतु पालकांनी मृत्यूदंडाच्या शिक्षेची मागणी केल्यानंतर न्यायालयाने आपल्या निर्णयात परत फेरविचार केला आहे. त्यामुळे आता पालकांचा आक्रोश कमी झालेला दिसत आहे.
२०१६ ते २०२१ या कालावधीत हेरी वीरावन नामक शिक्षकाने १२ ते १६ वयोगटातील आपल्याच शाळेतील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले होते. यातील ८ विद्यार्थिनी गर्भवती राहिल्या होत्या. या मुलींमार्फतच शिक्षकाने केलेले घाणेरडे कृत्य उघडकीस आले. इंडोनेशिया जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम राष्ट्रांपैकी एक असून येथील इस्लामिक शाळेत गरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यात येते.
आता शिक्षकाने केलेले हे कृत्य उघडकीस आल्यानंतर शाळेची बदनामी झाली आहे. या घटनमुळे इस्लामिक शाळेत मुलींच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान या घटनेच्या सुनावणी वेळी न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात आरोपी शिक्षकाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेवर पालकांनी समाधान व्यक्त केले नव्हते.
त्यामुळे या घटनेसंबंधीत न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करण्यात आली. यावेळी शिक्षकाला मृत्यूचीच शिक्षा द्या अशी विनंती पालकांनी न्यायालयात केली. त्यांच्या या मागणीचा विचार करत न्यायालयाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनीही आपली बाजू मांडण्यास नकार दिला.
याप्रकरणी शिक्षा सुनावल्यानंतर बालसंरक्षण मंत्री यांनी न्यायालयाच्या निकालाच स्वागत केले आहे. परंतु देशातील मानवाधिकार आयोगाने या निकालाला विरोध दर्शविला आहे. हा निकाल योग्य नसल्याचे आयोगाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
मनसे नेत्याचा राज ठाकरेंना घरचा आहेर; म्हणाला, ‘राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही’
धक्कादायक! पुण्यातील सरकारी अधिकाऱ्यांचा अवैध कारभार उघडकीस, ४४ जणांवर कारवाई
अमित शहा लवकरच समान नागरी कायदा मंजुरीसाठी आणतील, भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य
श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या सुनेनं कुटुंबियांसोबत सोडला देश, श्रीलंका आता वाऱ्यावर, लोकं संतापले