पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेने मुंबई हादरली आहे. 21 वर्षीय शिक्षिकेवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबई (Navi Mumbai) क्राईम ब्रांच टीमने आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. सध्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयूब इदरीस खान आणि शाहबाज जहीर अली अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून खान याच्या संपर्कात ही पीडित महिला आली. यांच्यात हळूहळू घट्ट मैत्री झाली.
आणि याच मैत्रीचा फायदा या आरोपींनी घेतला. अयूब खान याने शिक्षिकेला आपल्या वाढदिवसाच्या पार्टीसाळी आमंत्रण दिलं. पीडित महिला खान याने दिलेल्या पत्त्यानुसार गुजरातहून वांद्रे रेल्वे स्थानकात पोहोचली. नंतर आरोपी शिक्षिकेला भेटला आणि तो तिला घेऊन नवी मुंबईतील तळोजा येथे पोहोचला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच पीडित शिक्षिकेला अयूब इदरीस खान याने एका फ्लॅटवर नेऊन बिअर पाजली. यानंतर धक्कादायक बाब म्हणजे आरोपी खान याने शिक्षिकेवर बलात्कार केला. तर दुसरा आरोपी अली याने शिक्षिकेसोबत छेडछाड केली. यावेळी पीडित शिक्षिकेने जीव वाचवत फ्लॅटवरुन पळ काढला.
त्यानंतर तिने घडला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. लोकेशन ट्रेस केल्यामुळे ते आरोप कुठे आहेत याचा पोलिसांना शोध लागला. त्यानुसार पोलिसांची टीम लोकमान्य टिळक टर्मिनसच्या दिशेने रवाना झाली. एलटीटी येथे पोलीस ट्रेनमध्ये शिरले गाडीतून दोन्ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
दरम्यान, आरोपींना बेड्या ठोकल्यानंटर स्व: ता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. सध्या पोलिस यांची आणखी कसून चौकशी करत असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा मुंबई हादरली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुलीला होस्टेलमध्ये सोडण्याच्या बहाण्याने केला विनयभंग; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यावर गुन्हा दाखल
खोटा कळवळा दाखवणाऱ्या भाजप नेत्यांना मराठा आंदोलनात जाताना लाज कशी वाटत नाही?
मंत्री बच्चू कडू अडचणीत; ‘त्या’ प्रकरणात राज्यपालांनी दिले कठोर कारवाईचे आदेश
रात्रीचं जेवण केलं अन् मृत्यूच्या दाढेत अडकलं कुटुंब; विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू