शाळा म्हणजे ज्ञानमंदिर.. तर शिक्षक हे आपले आई – वडिलांनंतरचे दुसरे गुरु मानले जातात. समाजातील चांगल्या – वाईट गोष्टींमधील फरक आपल्याला कळावा म्हणून आपले आई – वडील आपल्याला शाळेत टाकतात. तसेच शिक्षण ही काळाची गरज असल्याने चांगले शिक्षण आपल्याला मिळावं यासाठी मुलांना पालक चांगल्या शाळेत टाकतात.
मात्र अलीकडे शाळेत अनेक धक्कादायक घटना घडत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शाळेतच शिक्षकाकडून मुलीवर बलात्कार, मुलींसोबत किळसवाणा प्रकार असे अनेक धक्कादायक प्रकार सध्या शाळेत घडताना पाहायला मिळत आहेत. यामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अशीच एक धक्कादायक घटना राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील देवली ब्लॉकमधील एका सरकारी शाळेत घडल्याचे उघडकीस आले आहे. शिक्षकाने त्याच्या सहकारी शिक्षिकेसोबत वारंवार विद्यार्थ्यांसमोर अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गाव क्रोधित झालं आहे.
चला तर मग जाणून घेऊया नक्की प्रकरण काय.. ही घटना आहे राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील देवली ब्लॉकमधील एका सरकारी शाळेतील. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या आरोपांनुसार शाळेत कार्यरत असलेला एक शिक्षक आणि शिक्षिका नेहमी अश्लील कृत्य करायचे.
धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांसमोरच ते किळसवाणा प्रकार करायचे. अखेर शाळेच्या मुलांनी संबंधित कृत्याबाबतची माहिती आपल्या आई-वडिलांना दिली. आणि संपूर्ण गाव क्रोधित झालं. या धक्कादायक प्रकाराचा निकाल लावण्यासाठी बुधवारी (3 मार्च) रोजी संपूर्ण गावाने शाळेवर मोर्चा काढला.
दरम्यान, अखेर शाळा प्रशासनाला संबंधित शिक्षक-शिक्षिकेला तातडीने बडतर्फ करावं लागलं. देवलीचे एसडीएम भारत भूषण गोयल यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत संबंधित शिक्षकांना कामावरुन काढून टाकण्याचे निर्देश दिले. सध्या या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बाईंना सलाम! होमवर्क केला नाही म्हणून चिमुकल्या विद्यार्थिनीला दिली ‘गोड शिक्षा’, व्हिडिओ तूफान व्हायरल
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मधील ‘या’ दोन स्पर्धकांचे नशीब फळफळले, रोहित शेट्टीने दिली चित्रपटात काम करण्याची संधी
करीना आणि काजोलच्या भररस्त्यातच सुरू झाल्या गप्पा; ‘या’ खाजगी मुद्यावर करत होत्या चर्चा
करोडोंच्या संपत्तीची मालकिन आहे श्रद्धा कपूर, महिन्याची कमाई एकून तोंडात बोटं घालाल