Share

School : ८-९ वीत शिकणाऱ्या मुलांच्या बॅगेत सापडले कंडोम, सिगारेट आणि दारु; देशभरात उडाली खळबळ

bags

teacher finds condoms in school students bag  | बेंगळुरूमधील एका शाळेतून एक अशी गोष्ट समोर आली आहे, जे ऐकून संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. शालेय दप्तरांच्या तपासणी मोहिमेदरम्यान अशा गोष्टी समोर आल्या, ज्यामुळे तपास अधिकारी, शिक्षक आणि पालकही आश्चर्यचकित झाले. शाळेच्या मुलांच्या बॅगेत चक्क कंडोम, दारु सापडली आहे.

इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बॅग तपासण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या बॅगमध्ये कंडोम, आय-गोळ्या, सिगारेट आणि दारू सापडली आहे. हे पाहून शिक्षक, पालकांसह सगळ्यांनाच धक्का बसला आहे. सध्या ही गोष्ट देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

बेंगलुरु येथील सर्व शाळांमध्ये मुलांच्या बॅगमध्ये मोबाईल सापडतात का हे बघण्यासाठी मुलांच्या दप्तरांची तपासणी करण्यात येत होती, मात्र तपासणीत धक्कादायक सत्य समोर आले. ८ वी, ९ वी, १० वीमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या बॅगेतच कंडोम, सिगारेट सापडली आहे.

आता कर्नाटकातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे (केएएमएस) व्यवस्थापनाचे सचिव डी. शशी कुमार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, बंगळुरूमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी मोबाइल फोन घेऊन जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या बॅग तपासण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर सर्व शाळांमध्ये अचानक तपासणी करण्यात आली होती. यादरम्यान, बेंगळुरूमधील काही शाळांमधील मुलांच्या बॅगमधून अशा गोष्टी बाहेर आल्या, ज्या आश्चर्यकारक आहेत. शशी कुमार म्हणाले की, एका शाळकरी मुलाच्या बॉटलमध्ये थेट दारु सापडली आहे, तर काही मुलांच्या बॅगेत कंडोम आणि सिगारेट.

याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, दहावीच्या विद्यार्थीनीच्या बॅगेत कंडोम सापडले आहे. विद्यार्थिनीला विचारपूस केली असता ती म्हणाली की ती कोचिंगला शिकायला जाते, तिथे शिकणाऱ्या काही मुलांनी तिच्या बॅगेत ते कंडोम टाकले असावे. या सर्व बाबींवर शाळांकडून विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना काही सूचना देण्यात आल्या आहे.

अनेकदा या वयात अनेक मुले एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी चुकीच्या गोष्टी करायला लागतात. यामध्ये नशेपासून बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांवर, त्यांच्या संगतीवर, त्यांच्या हावभावावर आणि वागण्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या-
rambhau khandare : मुलासाठी दिवसरात्र केलेल्या कष्टाचं झालं चीज, ५० वर्षे बुट पॉलिश करणाऱ्याचा मुलगा बनला अधिकारी
सावधान! फक्त १४ सेकंद मुलीकडे पाहीले तरी पुरूषांना होणार ‘ही’ भयानक शिक्षा; सरकारचा निर्णय
Bachchu Kadu : मंत्रिपद चुलीत घाला! नाराजीनाट्यानंतर आता बच्चू कडू ‘नवीन सुखाच्या पाऊलवाटेवर’; वाचा नेमकं काय घडलं..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now