दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या राजस्थानमधील उदयपूर भागातल्या कन्हैयालाल हत्याकांडाने देशभर खळबळ माजवली होती. आता याच घटनास्थळावर राजस्थानच्या हाथीपोल भागात मोहरमच्या निमित्ताने एक मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणुकी दरम्यान ताजियाच्या वरच्या भागाला आग लागली. प्रसंगावधान राखत एका हिंदू कुटुंबाने लागलेली आग पटकन विझवल्याने मोठा अनर्थ टळला. (Tazia Muharram caught fire where Kanhai Lal was killed)
विशेष म्हणजे ही आग ज्या ठिकाणी लागली. तिथून थोड्याच अंतरावर कन्हैयालाल या व्यक्तीचे दुकान आहे. देशाला हादरा बसवणारे कन्हैयालाल हत्याकांड अजून अनेक देशवासीयांच्या विस्मरणात गेले नसेल. तेच परत या ठिकाणीवरून ही दुसरी घटना घडल्याचे समोर येत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलटण मशिदीच्या शेवटच्या ताजियाची मिरवणूक हाथीपोल भागातील रस्त्यावरून जात होती. त्यावेळी पंचवीस फूट उंच ताजियाच्या वरच्या भागाला अचानक आग लागली.
त्यावेळी या परिसरातील एका हिंदू कुटुंबाने पटकन त्या आगीवर पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मदतीला धावून आलेल्या या हिंदू कुटुंबाचे परिसरातील सर्व मुस्लिम बांधव कौतुक करत आहेत.
आशिष चवाडिया आणि राजकुमार सोळंकी या व्यक्तींच्या परिवारांनी ताजियावर पाणी टाकत मोठया आगीच्या दुर्घटनेपासून अनेकांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे या कुटुंबांच्या व्यक्तींचे टाळ्यांचा कडकडाट करत त्या ठिकाणी उपस्थित मुस्लिम बांधवांनी आभार मानले.
काही दिवसांपूर्वी या घटनास्थळावरून थोड्याच अंतरावर असलेल्या कन्हैयालाल या व्यक्तीच्या दुकानात शिरून दोन व्यक्तींनी अमानुषपणे चाकू भोकसून त्याची हत्या केली होती. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली होती. परंतु आता घडलेल्या या घटनेत अपघात टळला असून धार्मिक सलोख्याचे चित्र सुद्धा समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या-
उद्धव ठाकरेंच्या जखमेवर शिंदे गट चोळणार मीठ, ‘या’ ठिकाणी उभारणार नवीन शिवसेना भवन
Shivsena: …तर त्यांनी शिवसेना फोडलीच नसती, राष्ट्रवादी काँग्रेसची शिंदे गटावर सडकून टीका
Pankaja Munde : ‘विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्यात माझाच हात’, पंकजा मुडेंच्या कबूलीने राजकारणात खळबळ