विवाहित महिलेबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेला सासरच्या मंडळींनी चक्क तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केली आहे. यामुळे घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
तसेच घटस्फोट देऊन टाक, अन्यथा ठार मारून टाकीन अशी धमकीही तिला देण्यात आली आहे. सासरचे तिचा छळ करायचे पती अनैसर्गिक कृत्य करून त्रास देत असे आणि दिरासह सासरचे इतर मंडळी तिचा विनयभंग करत. अनेकदा घरात ती एकटी असताना तिच्याबर गैरकृत्य करत होते.
यामुळे ती वैतागली होती. यामुळे अखेर तिने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता, न्यायालयाच्या आदेशाने सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल झाला. सातारा परिसरातील देवळाई भागात ही घटना घडली आहे. तिला अनेकदा मारहाण करण्यात आली आहे.
तुझ्या आईवडिलांनी लग्नात खर्च केला नाही. नंतर हुंड्याची मागणी करत तिला शारीरिक त्रास देखील दिला गेला. पती तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तिला त्रास देत असे, तर घरातील दिरासह इतर सदस्यांकडून घरात नको ते कृत्य करत असत.
सासरच्यांनी तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केली, तसे न केल्यास पतीला घटस्फोट देऊन टाक, अन्यथा ठार मारून टाकीन अशी धमकी दिली. नंतर विवाहितेने थेट पोलिस ठाणे गाठून तक्रार अर्ज दिला होता. पोलिसांनी देखील तिच्याकडे लक्ष दिले नाही.
नंतर विवाहितेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयाने सातारा पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश दिले. सासरच्या १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस तपास करत आहेत.