टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड (Tata Teleservices Maharashtra Limited -TTML) या टाटा समूहातील कंपनीचा शेअर दररोज नवीन उच्चांक गाठत आहे. गेल्या 11 ट्रेडिंग दिवसांमध्ये, हा स्टॉक वारंवार वरच्या सर्किटला पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना याचा खूप फायदा झाला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला 8 मार्च रोजी टीटीएमएलच्या (TTML) स्टॉकमध्ये लक्षणीय घट झाली होती. त्याची BSE वरील किंमत 93.55 रुपयांपर्यंत खाली आली होती. मात्र त्यानंतर या शेअर्समध्ये जी गती आली ती आता थांबत नाही. 8 मार्च ते 23 मार्च दरम्यान या शेअरच्या किमतीत 58 रुपयांनी वाढ झाली आहे.
जर आपण टीटीएमएल स्टॉकच्या वर्षभरातील परताव्यावर नजर टाकली तर गुंतवणूकदारांचा फायदा झालेला पाहायला मिळतो. हा शेअर एका वर्षापूर्वी 24 मार्च 2021 रोजी BSE वर केवळ 13.65 रुपये होता. आता 23 मार्च 2022 रोजी रु. 152.15 ची बंद किंमत पाहता, ज्या गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे त्यांना 1,014.65 % परतावा मिळाला आहे.
अशा प्रकारे, जर एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आता त्याला 10.14 लाख रुपये मिळतील. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा शेअर्स अतिशय फायद्याचा असल्याचं सांगता येईल. गेले पाच दिवस तर गुंतवणूकदारांसाठी आनंदाचे गेले हे समोर आलेल्या आकडेवारीवरून समजते.
जर तुम्ही टीटीएमएल स्टॉकची गेल्या 5 दिवसांची हालचाल पाहिली, तर तुम्हाला दिसेल की, प्रत्येक ट्रेडिंग सत्रात या शेअरला अप्पर सर्किट लागले आहे. 16 मार्च रोजी कंपनीचा शेअर 125.25 रुपयांवर होता. यानंतर 17 मार्चला 131.50 रुपये, 21 मार्चला 138.05 रुपये, 22 मार्चला 144.95 रुपये आणि 23 मार्चला 152.15 रुपयांवर बंद झाला.
मागील 6 महिन्यांचा कालावधी लक्षात घेतला तर या शेअरने 94.25 रुपये नफा दिला आहे. म्हणजेच प्रत्येक शेअरवर 253.70 टक्के परतावा दिला आहे. येथे, गेल्या 1 महिन्यात सततच्या अप्पर सर्किटमुळे, या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना भरमसाठ रिटर्न दिला आहे.