भारतीय बनावटीची टाटा ही बाजारपेठेतील प्रसिद्ध कंपनी म्हणून नावारूपास आहे. टाटाकडून नवनवीन एसयुव्ही कार बाजारात आणल्या जात आहेत. आगामी काळात टाटा एक उत्तम एसयुव्ही कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही टाटाची एसयूव्ही कार म्हणजे टाटा ब्लॅकबर्ड होय.
टाटा कंपनी लागोपाठ फक्त नवीन मॉडल्स भारतात उतरवत नाही तर वेगवेगळे व्हेरियंट्स सुद्धा आणत आहे, त्यामुळे ती काही वर्षांपासून आपल्या ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या या कंपनीच्या गाड्यांना ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. यातच आता टाटाच्या या नवीन ब्लॅकबर्ड एसयूव्ही कार ची चर्चा देखील रंगली आहे.
कंपनीचे प्रोडक्ट पोर्टफोलियोमध्ये या ब्लॅकबर्ड एसयूव्ही कारला टाटा हॅरियर खाली आणि टाटा नेक्सॉनच्या वर प्लेस केले जाणार आहे. म्हणजेच याचे फीचर्स टाटा नेक्सॉन पेक्षा जास्त दमदार असतील. याचा अंदाज घेतला जात आहे. या कारची काही खास वैशिष्ट्य आहेत, ज्यामुळे त्याची चर्चा होत आहे.
कंपनी या कारला खास यूथसाठी डिझाइन करणार आहे. कारचे इंजिन संबंधी अजून पर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, असे मानले जात आहे की, या कारमध्ये 1.5 लीटरचे 4 सिलिंडर इंजिन दिले जावू शकते. या प्रमाणे इंजिनचा वापर महिंद्रा थार मध्ये केला जातो.
तसेच या कारमध्ये तुम्हाला ऑल ब्लॅक थीम मिळेल. कारमध्ये तुम्हाला 8.8 इंचाचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. ज्याला तुम्ही वायरलेस अँप्पल कार प्ले, आणि अँड्रॉयड ऑटो सोबत कनेक्ट करू शकता. यात तुम्हाला वायरलेस चार्जर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॅनारमिक सनरूफ आणि लेदर सीट सारखे फीचर्स देखील मिळणार आहेत.
भारतात नवीन एसयुव्ही कार येणार म्हटले की ग्राहकांना उत्सुकता लागते. टाटाकडून कमी किंमतीत सगळे फिचर्स मिळतील अशी या कारची रचना करण्यात आली आहे. ब्लॅकबर्डचे आत्तापर्यंत समोर आलेले फोटो पाहता ग्राहकांना या कारचे वेड लागले आहे असे दिसून आले आहे.