Share

Tata punch : टाटाच्या ‘या’ स्वस्त कारने घातला धुमाकूळ, ओलांडला १ लाखांचा टप्पा, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

tata punch

Tata punch | टाटा मोटर्सची परवडणारी एसयूव्ही टाटा पंच या गाडीला ग्राहकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. लॉन्च झाल्यापासून ते देशातील टॉप 10 वाहनांपर्यंत या गाडीने ग्राहकांचे मन जिंकले आहे. जुलै महिन्यातही तिची जोरदार विक्री झाली. आता या एसयूव्हीने विक्रीचा नवा टप्पा पार केला आहे.

टाटा पंच या SUV ने 10 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 1 लाख विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. टाटा मोटर्सने गुरुवारी त्यांच्या पुणेस्थित प्लांटमधून टाटा पंचचे 1,00,000 वे युनिट रिलीज केले. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते जुलै 2022 पर्यंत या SUV चे सुमारे 94,420 युनिट्स विकले गेले होते आणि आता 1 लाखवे युनिट लवकरच वितरित केले जाईल.

टाटा मोटर्सचा दावा आहे की टाटा पंच ही 1 लाखांचा टप्पा गाठणारी सर्वात वेगवान एसयूव्ही आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्र म्हणाले, “पंचने 10 महिन्यांच्या अल्प कालावधीत 1 लाख विक्रीचा टप्पा गाठला आहे हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे.

आमच्या ‘न्यू फॉरएव्हर’ पोर्टफोलिओमध्‍ये ही सर्वाधिक विकली जाणारी SUV आहे. आम्हाला खात्री आहे की पंच ग्राहकांच्या पसंतीस उतरत राहील. टाटा पंचची किंमत रु. 5.83 लाख पासून सुरू होते आणि रु. 9.49 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते.

ही कार महिंद्रा KUV100 NXT आणि मारुती इग्निस सारख्या वाहनांशी स्पर्धा करते. किंमत पाहिली तर, ती निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट किगर या गाड्यांनाही तोड देते. टाटा पंचला 1.2-लीटर पेट्रोल इंजिन (86PS/113Nm) मिळते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायी 5-स्पीड AMT सोबतही मिळते.

इंजिन मॅन्युअल गिअरबॉक्ससह 18.82 kmpl आणि AMT सह 18.97 kmpl मायलेज देते. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या मायक्रो एसयूव्हीमध्ये 7-इंचाची टचस्क्रीन प्रणाली, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो एसी, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, कनेक्टेड कार टेक आणि क्रूझ कंट्रोल आहे. विशेष म्हणजे या कारला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंगही मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या
Arjun Kapoor: अजुनतरी मलायकासोबत लग्नाचा विचार केला नाही कारण.., अर्जुन कपूरने केला मोठा खुलासा
Sunil raut : ..त्यानंतर ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून हटवणाऱ्यांचा सुड घेणार, राऊतांच्या इशाऱ्याने खळबळ
‘रेड’मधील अजय देवगण स्टाईलने आयकर विभागाची छापेमारी, जालन्यातून ३९० कोटींची मालमत्ता जप्त
Shivsena : “कारकुन, रिक्षावाल्यांना मोठं करणाऱ्या ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घेतलं तर बिघडलं कुठं?”

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now