Share

टाटा आता शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान! कांदा साठवणुकीसाठी विकसित केले स्मार्ट सोलुशन

ratan tata

पुणे । राज्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची (onion) लागवड केली जाते. मात्र कांदा साठवला तरच त्याचे पैसे होतात, अनेकदा कांद्याचे पीक काढणीला आल्यानंतर भाव नसतो. अशावेळी कांद्याची साठवणूक करावी लागते. मात्र कांद्याच्या साठवणूकीनंतर देखील मोठ्या प्रमाणावर कांदा खराब होतो. (tata onion storage techonolgy coming soon)

यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. मात्र आता टाटा स्टीलने (tata steel) याबाबत आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. कांदा हा जास्त काळ टिकणारा नसल्यामुळे त्याची साठवणूक तंत्रशुद्ध पद्धतीने करणे फार गरजेचे असते.

कांद्याचे बाजार भाव आहे नेहमी कमी जास्त होत असतात. यामुळे शेतकऱ्यांचा साठवणूकीकडे कल असतो. मात्र कांदा खराब होतो, आता यावर उपाय शोधत टाटा स्टीलच्या मॉड्यूलर कंस्ट्रक्शन सोल्युशन ब्रांड नेस्ट नेदेशातील पहिले कांदा साठवणुकीसाठी एक सोल्युशन ऍग्रो नेस्ट लॉन्च केले आहे.

याचा आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे अनेक दिवस कांदा साठवता येणार आहे. या तंत्रज्ञानामध्ये विज्ञान, नवीन अद्यावत इनोवेशन चा वापर केला गेला आहे. बर्‍याचदा शेतकर्‍यांनी साठवणूक करण्याच्या पद्धतीत बर्‍याच कमतरता असतात.

तसेच साठवणुकीचे साहित्य निकृष्ट असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा निम्मा कांदा चाळीतच खराब होतो. टाटा स्टीलच्या नेस्ट इन आणि इनोव्हेटर टीमने एक स्मार्ट वेअर  हाऊस म्हणजे गोदाम सोलुशन ॲग्रोनेस्ट विकसित केले आहे.

यामध्ये तापमान, ओलावा आणि गॅसवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेन्सर लावण्यात आले आहे. जे सेंसर माल खराब होण्याआधी आपल्याला माहिती देतात. यामुळे आता माल किती दिवस टिकणार आणि कधी खराब होणार याबाबत शेतकऱ्यांना आधीच माहिती मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या
लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ते वेदनादायक तीन महिने; मृत्यूच्या दारातून आल्या होत्या परत
ओमीक्रोनचे दुसरे रूप BA.2 मुळे सर्वत्र टेन्शनच वातावरण; वाचा किती धोकादायक आहे हा व्हायरस
कोरोनाशी झुंझ देत असताना लतादींदींना झाला होता ‘हा’ भयानक आजार, सर्व अवयव होतात खराब
पुर्ण देशालाच कोरोनाने घेरले होते, तो महाराष्ट्रातूनच पसरला असं कसं म्हणता? सोनू सुदचा रोखठोक सवाल

इतर

Join WhatsApp

Join Now