Tarak Mehta Ka Ooltah Chashma, Jainiraj Rajpurohit, Asit Modi/ तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ulta Chashma) या लोकप्रिय शोमध्ये शैलेश लोढा यांची जागा कोण घेणार? या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना हवे होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माता असित मोदी यांनी नवीन तारक मेहताच्या भूमिकेसाठी अभिनेता जैनीराज राजपुरोहितला (Jainiraj Rajpurohit) फायनल केले आहे. या बातमीत किती तथ्य आहे ते जाणून घेऊया.
जैनीराज राजपुरोहितच्या कास्टिंगच्या बातमीवर शोचे निर्माते असित मोदी यांनी एका खाजगी वृत्तसंस्थेशी संवाद साधला. असित मोदींनी हे वृत्त पूर्णपणे चुकीचे म्हटले आहे. तारकच्या भूमिकेत जैनीराज राजपुरोहितला कास्ट करण्यात आल्याच्या वृत्तात तथ्य नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व अनुमान आहेत. तारक मेहताच्या भूमिकेत कधी कोण फायनल होईल, ते सांगितले जाईल.
तसेच, तारक मेहताच्या भूमिकेत शैलेश लोढा निर्मात्यांची पहिली पसंती होती. पण शैलेशने शोमध्ये परतायचे नाही असे ठरवले आहे. शैलेश आणि शोचे निर्माते असित मोदी यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रुत आहे. शैलेश लोढा परत आले तर ठीक नाहीतर नवे स्टार येतील असे असित मोदी म्हणाले होते.
असित मोदी यांनी शैलेशची टीका केली होती. त्याच वेळी, शैलेशही इन्स्टावर गूढ पोस्ट शेअर करत राहतो, ज्या लोकांना असित मोदींना टोमणा मारल्यासारख्या वाटतात. जैनीराज राजपुरोहित अनेक मोठ्या टीव्ही शोमध्ये दिसले आहेत. बालिका वधू, लागी तुझसे लगन, मिली जब हम तुम सारख्या मालिकेत पाहायला मिळाले, याशिव जैनराजने लोकप्रिय बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले आहे.
जैनराज अक्षय कुमारच्या ओह माय गॉड, आउटसोर्स्ड सलाम वैंकी सारख्या चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याच्या दमदार अभिनयाचे कौतुक करताना लोक थकत नाहीत. विनोदी भूमिका असो वा गंभीर, जैनराज प्रत्येक पात्रात जीव ओततो. त्याचे भाव अप्रतिम आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा 2008 पासून लोकांचे मनोरंजन करत आहे. या शोला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या काही वर्षांत, अनेक नवीन स्टार्स तारक मेहतामध्ये सामील झाले आणि अनेकांनी शोला अलविदा केल आहे. मात्र या शोबाबत लोकांची क्रेझ आणि लोकप्रियता कमी झालेली नाही.
तारक मेहता का उल्टा चष्मामधून केवळ शैलेश लोढाच नाही तर दिशा वकानी, गुरचरण सिंग, नेहा मेहता यांसारखी मोठी नावे बाहेर पडली आहेत. जेव्हा हे सर्व स्टार्स शोमधून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला. पण असे म्हटले जाते की हा शो चालूच राहिला पाहिजे. त्यामुळे या सर्व वादांच्या पलीकडे तारक मेहता शो आपल्या मजेशीर कथेने लोकांची मने जिंकत आहे.
महत्वाच्या बातम्या-
अखेर तारक मेहता मालिकेत दयाबेनची पुन्हा एंट्री झालीच; पहा नव्या प्रोमोचा व्हिडीओ
TMKOC: तारक मेहतामधील ‘या’ अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, नवरदेवाचे नाव वाचून आश्चर्य वाटेल
Anjali bhabhi Video: ‘तारक मेहता’मधील अंजली भाभीनेही दाखवला आपला हॉट अवतार, पाहून चाहते शॉक
दिशा वकानीनं ‘या’ व्यक्तीमुळे सोडला ‘तारक मेहता शो’; वाचा काय आहे नेमकं कारण