बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता दीर्घकाळापासून अभिनापासून लांब आहे. असे असले तरी ती नेहमी चर्चेत असते. तनुश्री ‘मीटू चळवळीमुळे फारच चर्चेत आली होती. त्यानंतर ती सोशल मीडियावर सक्रिय झाली. तर आता तिच्या एका पोस्टमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. नुकतीच तनुश्रीने इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करत विकिपीडियावर आपला नाराज (tanushree dutta upset over wikipedia profile) व्यक्त केला आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
तनुश्री दत्ताने इन्स्टाग्राम हँडलवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत तिने लिहिले की, ‘नमस्कार मित्रांनो. काही काळापासून मला एका गोष्टीचा खूपच त्रास होत आहे. ते म्हणजे विकिपीडियावरील माझा प्रोफाईल. विकिपीडियावर माझ्यासंदर्भात जी माहिती देण्यात आली आहे, त्यामध्ये माझ्यासंदर्भात खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी लिहिण्यात आले आहेत. तसेच यामध्ये माझे श्रेय कमी करण्यात आले आहे’.
तनुश्रीने पुढे लिहिले की, ‘यामध्ये मी बदल करण्याच प्रयत्न केला. पण त्यामध्ये काही होत नाही आणि पुढे तीच माहिती दाखवत आहे. मी मिस इंडिया युनिव्हर्स आहे. तसेच मी एक बॉलिवूड अभिनेत्री किंवा स्टार आहे. पण विकिपीडियावर मला केवळ भारतीय मॉडेल असल्याचे दाखवण्यात येत आहे’.
‘जेव्हा लोक गुगल या सर्च इंजिनवर एखाद्या प्रसिद्ध व्यक्तींच्या कामाबद्दल आणि त्यांच्या पुरस्कारांबद्दल शोधतात तेव्हा ते पहिल्यांदा विकिपीडियावर पाहतात. परंतु, यामध्ये माझ्याबाबत सर्व विचित्र आणि चुकीचे लिहिले गेलेले आहे. तुम्ही स्वतः कल्पना करा की, मी माझ्या आयुष्यात इतकं काही केल्यानंतरही माझ्याबाबत विकिपीडियावर योग्य आणि अचूक माहिती देण्यात आली नाही’.
पुढे तिने लिहिले की, ‘असेही होऊ शकते की, धर्मग्रंथ बरोबर असेल व माझ्या पुरस्कार आणि माझ्या कामाला स्वर्गातच ओळख मिळेल. मी अशा प्रकारच्या विचित्र गोष्टींना सोडून दिले आहे कारण याबद्दल मी काही करू शकत नाही, असे वाटत आहे. जर कोणी मदत करू शकत असेल तर कृपया करा. तसेच मला वाटते की, २०२२ मध्ये माझ्यासाठी खूप छान आणि आश्यर्चयकारक गोष्टी घडणार आहेत’.
दरम्यान, तनुश्री दत्ताने २०१८ साली प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे चर्चेत आली होती. तनुश्रीचे म्हणणे होते की, २००९ साली ‘हॉर्न ओके’ चित्रपटादरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर ती इंडस्ट्री सोडून अमेरिकेत गेली. तनुश्रीच्या या आरोपानंतर सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली होती. तसेच तिच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये मीटू चळवळ सुरु झाली होती’.
महत्त्वाच्या बातम्या :
ज्या नवरा-बायकोसाठी फडणवीसांनी पर्रिकरांना डावललं, तेच आता पक्के अडकले; भाजपवर नामुष्की
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच केली होती हत्या, धक्कादायक कारण आले समोर
‘या’ कारणामुळे नूतनने संजीव कुमार यांना भर शुटींगमध्ये दिली होती कानशिलात, वाचा किस्सा