Share

मी तोंड उघडलं तर.., घर ते कार्यालय अन् कार्यालय ते घर दौरा करणारे तानाजी सावंत ट्रोल झाल्यामुळे संतापले

राजकीय नेते मंडळी नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात, त्यांचा दौरा असो की व्यक्तव्य..! नेते मंडळी सतत चर्चेत असतात. हे सांगण्याच कारण म्हणजे, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे त्यांच्या अनोख्या दौऱ्याने चांगलेच चर्चेत आले आहेत.

राजकीय वर्तुळासह सोशल मिडियावर तानाजी सावंत यांच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी मिटकरींनी तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट २०२२ रोजीच्या दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका शेअर केली होती. ही कार्यक्रम पत्रिका आता व्हायरल होऊ लागली आहे.

याचबरोबर सोशल मीडियावर तानाजी सावंत यांच्या दौऱ्याचे फोटो व्हायरल होत असून घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर, तसेच राखीव असा हा दौरा असल्याचे दिसून येते. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी, रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या अकाऊंट्सवरुन या दौऱ्याबद्दल ट्वीट करत सावंत यांची खिल्लीही उडवली होती.

एकनाथ शिंदे गटातील नवनिर्वाचित मंत्री असलेल्या सावंतांच्या दौऱ्यात कोणत्याही बैठका, सभा किंवा पत्रकार परिषद नसल्याने आणि या प्रवासादरम्यान पोलीसांचा कॉनव्हॉय तैनात असल्याने सगळीकडे या दौऱ्याची राजकीय वर्तुळासह सोशल मिडियावर जोरदार चर्चा होत आहे.

अशातच आता याच मुद्यावरून खुद्द तानाजी सावंत हे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. माध्यमांशी बोलताना सावंत यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘वरिष्ठांच्या सूचनेमुळे मी शांत आहे. पण ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यावेळी मात्र ८ दिवस हंगामा माजेल,’ असं सावंत यांनी म्हंटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हंटलं आहे की, ‘मी आज पिंपरी-चिंचवडला गेलो. तेथील काही लोकांना भेटलो. माझ्या मतदारसंघात एकाचा मृत्यू झाला, तिकडे मी होतो. तसेच विविध कामांचा आढावा घेतला. जे कोणी राजकीय विरोधक आहे, त्यांनी सांगितलं की सावंत यांचा एक किमी.चा दौरा आहे.’

मात्र शासनावर ताण येऊ नये, यासाठी मी सुरक्षा देखील टाळतो, असं सांगत वरिष्ठांच्या सूचनेमुळे मी शांत आहे. पण ज्या दिवशी तोंड उघडेन, त्यावेळी मात्र ८ दिवस हंगामा माजेल, असा इशाराही तानाजी सावंत यांनी यावेळी बोलताना दिला आहे. यामुळे सध्या सावंत यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल
Shivsena : झंडूबाम घेऊन ठेवा कारण तुमची.., शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा
शिवसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला; ‘या’ मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ
रात्रीच्या बैठका घेतात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now