tanaji sawant : “…तर बीडमध्ये नागडा करून मारू” शिंदे गटाच्या नेत्याचं धनंजय मुंडेबाबत खळबळजनक विधान

tanaji sawant : सध्या शिंदे गटातील नेते मंडळी चांगलेच चर्चेत आहेत. शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमधील नेते मंडळी वेगळ्याच धुंदीत असल्याचं पाहायला मिळतं आहे. हे सांगण्याच कारण म्हणजे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी नुकतच एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

यामुळे पुन्हा एकदा सावंत हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बीडमध्ये एका सभेत बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तसं पाहायला गेलं तर तानाजी सावंत हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यासाठी चर्चेत असतात. वाचा आता सावंत यांनी काय म्हंटलंय?

‘आमच्यावर शिंतोडे टाकण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला नागडा करून मारू,’ असं तानाजी सावंत यांनी म्हंटलं आहे. सावंत यांनी शिवसेनेसोबत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

बीडमध्ये हिंदू गर्जना मेळाव्यात बोलताना सावंत यांची जीभ घसरलेली पाहायला मिळालं. “तुमचा आवाज काय? तुमचं चारित्र्य काय? तुम्ही कुणावर शिंतोडे उडवता. आम्हालाही बोलता येतं. माझ्या नेत्यावर टीका करायची परंपरा तुम्ही सोडली नाही तर या बीडमध्ये तुम्हाला नागडा करुन मारताना दिसणार,” असं सावंत यांनी म्हटलंय.

दरम्यान, पुढे सावंत यांनी म्हटले की, माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य त्यांनी केले. मुख्यमंत्र्यावर टीका करण्याअगोदर तुमचे चारित्र्य तपासा असं म्हणत सावंत यांनी मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात की, आम्हाला तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका यावर सावंत यांनी जोरदार पलटवार केला आहे. तुम्ही म्हणता माझ्या वडिलांचे छायाचित्र लावायचे नाही. मग, माझ्या शिवबाचे छायाचित्र लावायचा तुम्हाला काय अधिकार आहे? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.