tamilnadu score 500 plus in odi | क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे रोज अनेक रेकॉर्ड बनत राहतात. अनेक रेकॉर्ड तर असे बनतात ज्याचा कोणी विचारही करु शकत नाही. असाच एक रेकॉर्ड आता सोमवारी झाला आहे. भारतात सुरू असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत तामिळनाडूच्या संघाने ५० षटकांत ५०६ धावा करत खळबळ उडवून दिली आहे.
सोमवारी अरुणाचल प्रदेश विरुद्ध तामिळनाडू असा सामना झाला होता. विजय हजारे करंडक स्पर्धेतील या सामन्यात, तामिळनाडू संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात २ विकेट गमावून ५०६ धावा केल्या. यासह तामिळनाडू संघाने एक मोठा विश्वविक्रम केला आहे.
तामिळनाडू संघ ‘ODI’ क्रिकेटमध्ये म्हणजेच ५० षटकांत ५०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला संघ ठरला आहे. या बाबतीत तामिळनाडूने इंग्लंड क्रिकेट संघाला मागे टाकले आहे. या वर्षी जूनमध्ये इंग्लंडने नेदरलँड्सविरुद्ध ५० षटकांत ४९८ धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे ते पहिल्या स्थानावर होते. पण आता तामिळनाडूने ५०० धावा ठोकल्या आहे.
अशाप्रकारे तामिळनाडू संघाने इंग्लंडला मागे टाकत ‘ODI’ क्रिकेटमध्ये (५० षटकांचे क्रिकेट) हा मोठा विश्वविक्रम केला आहे. तामिळनाडूचा सलामीवीर साई सुदर्शनने १०२ चेंडूत १५४ धावा केल्या. त्याचवेळी नारायण जगदीशनने १४१ चेंडूत २७७ धावांची खेळी केली.
तामिळनाडूचे सलामीवीर साई किशोर आणि नारायण जगदीशन यांनी पहिल्या विकेटसाठी ४१६ धावांची भागीदारी केली. तामिळनाडूचा सलामीचा फलंदाज नारायण जगदीशन याने अरुणाचल प्रदेशच्या गोलंदाजांना घामाघूम केले होते. त्याने त्याच्या खेळीत २५ चौकार आणि १५ षटकार ठोकले.
५० षटकांमध्ये संघाची सर्वोच्च धावसंख्या:
१. तामिळनाडू – ५०६/२
२. इंग्लंड – ४९८/६
३. सरे – ४९६/४
४. इंग्लंड – ४८१/४
५. भारत अ – ४५८/४
महत्वाच्या बातम्या-