Share

‘जय भीम’च्या शिरपेचात मानाचा तुरा; ऑस्करच्या युट्यूब चॅनलवर दिसणारा पहिला भारतीय चित्रपट

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सूर्याच्या भूमिकेची आणि त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा करण्यात आली होती. तसेच चित्रपटाची कथेसोबत यामधील सर्व कलाकारांनाही प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. यादरम्यान आता आणखी एका कारणामुळे हा चित्रपट चर्चेत आहे.

सूर्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाने आपल्या नावे आणखी एक रेकॉर्ड केला आहे. ते म्हणजे ऑस्करच्या युट्यूब चॅनेलमध्ये ‘जय भीम’ चित्रपटाला स्थान मिळाले आहे. ऑस्करच्या अॅकेडमिक अवॉर्डच्या युट्यूब चॅनलवर हा चित्रपट दाखवण्यात आला आहे. एवढेच नाही तर हा मान मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे.

यापूर्वी ‘जय भीम’ हा चित्रपट ‘गोल्डन ग्लोब्स २०२२’ मध्ये ‘बेस्ट नॉन इंग्लिश फिल्म’च्या कॅटेगिरीत नामांकन मिळवले होते. याशिवाय IMDB ने २०२१ मधील लोकप्रिय चित्रपटांची यादी जाहिर केली होती. त्यामध्ये हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर होता.

‘जय भीम’ हा चित्रपट तमिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. तर चित्रपटाचे कथानक मागासवर्गीय लोकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या वकील चंद्रू यांच्या जीवनाशी प्रेरित आहे. वकील चंद्रू यांनी तमिळनाडूमधील अनेक मागासवर्गीय लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी मदत केली होती.

चित्रपटात दाखवण्यात आले की, आदिवासी आणि सर्पमित्र असणाऱ्या राजाकन्नू नावाच्या व्यक्तीला पोलीस चोरीच्या आरोपाखाली अटक करतात. जेलमध्ये त्याला पोलिसांकडून खूप मारहाण करण्यात येते. यामध्ये त्याचा मृत्यू होतो. ही गोष्ट लपवून ठेवण्यासाठी पोलीस राजाकन्नू जेलमधून पळून गेल्याचे सांगतात.

त्यानंतर राजाकन्नूची पत्नी संगिनी तिच्या पतीला शोधण्यासाठी आणि पोलिसांच्या तावडीतून त्याची सुटका करण्यासाठी वकिल चंद्रू म्हणजेच सूर्याची मदत घेते. तर वकिल चंद्रू या महिलेची कशी मदत करतात आणि मागासवर्गीय लोकांच्या हक्कांसाठी ते कशाप्रकारे लढा देतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

सूर्या अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शन टी. जे. ज्ञानवेल यांनी केले. नोव्हेंबर २०२१ मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये सूर्यासोबत प्रकाश राज, राजिशा विजयन मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट तमिळसोबत तेलूगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या : 

मिथुन चक्रवर्तीला चार मुलं, पण पापा म्हणून हाक ऐकण्याचा आनंद कधीच नाही मिळाला, जाणून घ्या काय आहे कारण
अल्लू अर्जुननंतर ‘या’ बॉलिवूड स्टारसोबत काम करण्यास प्रचंड उतावळे झालेत पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार

संजय दत्त मद्यधुंद अवस्थेत मध्यरात्री श्रीदेवीच्या खोलीत शिरला, अभिनेत्रीच्या किंचाळण्याने स्टुडिओ हादरला होता ; वाचा किस्सा..   

 

मनोरंजन बाॅलीवुड

Join WhatsApp

Join Now