Share

नदी आटल्यानंतर सुकलेल्या पात्रात दिसलं ‘हे’ भयानक दृश्य; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

डायनासोरच्या अस्तित्वाच्या खुणा आतापर्यंत अनेकदा सापडल्या आहेत. आता आणखी एका ठिकाणी डायनासोरच्या अस्तित्वाचं पुरावे आढळले आहेत. डायनासोरच्या दोन प्रजातींच्या पायांच्या पाऊलखुणा सापडल्या आहेत, सध्या हा संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरला आहे .

माणसाने कधीच डायनासोर पाहिलेले नाहीत, मात्र त्याच्या अस्तित्वाचे पुरावे सारखे आढळून येतात. आता अमेरिकेच्या टेक्सासमधल्या डायनासोर व्हॅली स्टेट पार्कमध्ये असलेल्या नदीपात्रात डायनासोरच्या अस्तित्वाचं पुरावे आढळले आहेत. दुष्काळामुळे नदी आटल्यानं डायनासोरच्या दोन प्रजातींच्या पायांच्या पाऊलखुणा सापडल्या आहेत.

टेक्सासमधून वाहणाऱ्या नदीत डायनासोरच्या पाऊलखुणा सापडल्या आहेत. ही नदी डायनासोर व्हॅली स्टेट पार्कातून वाहते. आता नदीतील पाणी आटल्यानं महाकाय डायनासोरच्या पाऊलखुणा स्पष्टपणे दिसून येत आहेत. डायनासोरच्या पाऊलखुणांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

टेक्सास पार्क अँड वाईल्डलाईफ डिपार्टमेंटच्या अधिकारी स्टेफनी सलीनाज ग्रेसिया यांनी सांगितलं की, उन्हाळ्यात अधिक दुष्काळ पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नदी आटली. त्यामुळे डायनासोर मार्गक्रमण करत असलेली अनेक ठिकाणं आढळून आली आहेत. आधी हे भाग नदीच्या पाण्याखाली होते.

माहितीनुसार, टेक्सासमधील पार्कमध्ये आढळून आलेल्या पाऊलखुणा डायनासोरच्या एक्रोकँथॉसॉरस प्रजातीच्या आहेत. पूर्णपणे वाढ झालेल्या एक्रोकँथॉसॉरसचं वजन ७ टन असायचं. त्याची लांबी १५ फूट असायची. सॉरोपोसिडॉन प्रजातीच्या डायनासोरच्या पाऊलखुणादेखील आढळून आल्या आहेत. सॉरोपोसिडॉनचं वजन ४४ टन असायचं. त्याची लांबी तब्बल ६० फूट असायची.

सुमारे १६ कोटी वर्षांपूर्वी डायनासोर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसोरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी होते. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनोसोरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते.

इतर

Join WhatsApp

Join Now