Share

मला फसवून शिंदे गटात नेले, पुन्हा पक्षात घ्या; पुण्यातील बड्या शिवसेना नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सर्वाधिक आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, खासदार शिंदे गटात जात असल्याचे साधारण चित्र होते. परंतु आता शिंदे गटातून आउटगोइंग व्हायला सुरुवात झाली आहे. असा एक प्रसंग पुण्यामध्ये घडल्याने या चर्चांना उधाण आले. (A letter from a senior Shiv Sena leader in Pune to Uddhav Thackeray)

काही दिवसांपूर्वी पुण्यातील काही नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यामध्ये सामील असणारे शिवसेनेतील झोपडपट्टी सेना प्रमुख राजू विटकर यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत आपली फसवणूक झाल्याचा दावा केला आहे.

‘नकळत मला शिंदे गटात सामील करून घेतले गेले. माझी फसवणूक झाली आहे. मला माफ करावे व पुन्हा पक्षात घ्यावे,’ अशी विनंती करणारे पत्र विटकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

‘माझी फसवणूक झाली आहे. तरी मी आता पुन्हा आपल्याकडे येऊन पक्षासाठी काम करणार आहे. सचिन आहिर आणि नीलम गोरे यांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे. मला पक्ष्यात घ्या,’ असे देखील विटकर यांनी पत्रात लिहिले आहे.

पुण्यातील शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिंदे गटाकडून पुण्यासाठी जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुखाची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

शिंदे गटात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी जात असल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले. परंतु जाणारी काही पावले पुन्हा परत वळताना दिसत असल्यामुळे हे चित्र शिवसेनेसाठी सकारात्मक म्हणावे लागेल.

महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यामुळे माझ्यात लढण्याची हिंमत आली; आदित्य ठाकरेंची भर सभेत कबुली
भाजप विरूद्ध शिंदे गटात जुंपली; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला शिंदे गटाकडून जोरदार प्रत्यूत्तर
aditya thackeray: आदित्य ठाकरेंनी घातला शिवसैनिकांच्या काळजाला हात, बंडखोरांवर हल्लाबोल करत म्हणाले…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now