भारत आणि पाकिस्तानमधील सबंध प्रसिद्ध आहेत. हिंदुस्तान आणि पाकिस्तानच्या फाळणीत एका देशाचे दोन देश झाले होते. देशांची फाळणी झाली असली तरी, दोन्ही देशांमधला एक धागा दोन्ही देशांना नेहमी जोडून ठेवतो. तो जोडून ठेवणारा धागा म्हणजे लता मंगेशकर.(Take Kashmir but give us Lata Mangeshkar)
फाळणीद्वारे भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले, पण त्याचसोबत त्यांच्या आवडत्या गायिका लता मंगेशकर त्यांच्यापासून दूर झाल्या होत्या. मात्र दूर असूनही पाकिस्तानी संगीतप्रेमी लता दीदीच्या गाण्यापासून कधीच दूर झाले नाहीत. काहीही झाले तरी लतादीदींनी आपल्याकडे यावे, असे पाकिस्तानला नेहमी वाटत होते. त्यासाठी पाकिस्तान काश्मीरही द्याला तयार झाला होता.
याबाबत ऑल इंडिया रेडिओला पत्रदेखील देण्यात आले होते. या पत्रात लता मंगेशकर यांच्या बदल्यात काश्मीर ठेवावे, पण लता मंगेशकर पाकिस्तानला द्या, असे म्हणाले होते. लता मंगेशकर यांच्या चाहत्यांमध्ये सर्वसामान्य लोक आहेतच, पण त्याचसोबत अनेक दिग्गज गायाकांचाही यात समावेश होतो.या यादीत महान गायिका नूर जहाँ यांचाही समावेश होतो.
एकदा लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलताना नूर जहाँ म्हणाल्या की, ‘ती माझी प्रशंसा करते’. पण लता मंगेशकर एकच आहेत, त्यांच्यासारखे आजवर दुसरे कोणी जन्माला आले नाही. लता मंगेशकर पाकिस्तानी लोकांसाठी किती महत्वाच्या होत्या, हे या गोष्टीवरून समजू शकते. भारतात राहूनही त्या पाकिस्तानी लोकाचा जीव होत्या.
संगीताच्या दुनियेत अनेक संगीतकार जन्माला आले, पण त्या सगळ्यात लता मंगेशकर खास होत्या. जणू माता सरस्वतीच त्यांच्या गळ्यात वास करत होती. लतादीदींच्या आवाजात एक शांतात होती, जी ऐकूण मनाला गारवा मिळायचा. त्यांच्या आवाजाच्या चर्चा देशातच नव्हे तर, परदेशातही गाजल्या आहेत.
त्यामुळे त्यांचा मधुर आवाज हा नेहमी शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय बनला आहे. त्यांच्या व्होकल कॉर्ड्सवर परदेशी शास्त्रज्ञांना संशोधन करायचे आहे, असे ते म्हणतात. लता मंगेशकर संगीत क्षेत्रातील अशी व्यक्ती आहे, जिची उणीव कधीच भरून निघू शकत नाही. लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत पण त्यांची सदाबहार गाणी दोन देशांची दारे एकत्र ठेवतील, अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
सीगारेट ओढाल तर थेट तुरुंगात जाल; भरावा लागू शकतो १ लाख रुपये दंड
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडेचं उथळ वागणं पाहून युजर्स खवळले, पहा ‘तो’ व्हिडिओ