Akola : एमआयएम-भाजप युती फसली; फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर 5 नगरसेवकांनी पाठिंबा घेतला मागे, आमदाराला नोटीस

Akola : अकोला आणि अंबरनाथ (Ambernath) नगरपालिकांमध्ये नुकतीच घडलेली भाजप (BJP) आणि एमआयएम (MIM) युती राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा निर्माण करत होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही युती मान्य नसल्याचे स्पष्ट करताच, स्थानिक नेत्यांकडून युती मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अकोला जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’मध्ये (Akot Vikas Manch) एमआयएम … Read more

Chandrashekhar Bawankule: अजितदादा, 70 हजार कोटींच्या प्रकरणाचा निकाल अद्याप बाकी; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक इशारा

Chandrashekhar Bawankule: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आघाडीत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर जोरदार टीका करत 70 हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा उल्लेख केला. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यासोबतच आज सत्तेत बसलो आहे, असा टोला देत त्यांनी भाजप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या … Read more

Eknath Shinde: ‘सीएम’ला सोन्याची शिंगे येतात का? एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

Eknath Shinde : इगतपुरी (Igatpuri) येथील सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाषणादरम्यान एक वेगळाच मुद्दा उचलत वातावरण तापवलं. ते म्हणाले की, मुख्यमंत्री असताना लोक त्यांना ‘सीएम’ म्हणायचे, पण त्यांच्या मते ‘सीएम’ म्हणजे कॉमन मॅन. “चीफ मिनिस्टर म्हटलं म्हणून कुणाला सोन्याची शिंगे येतात का? आणि कॉमन मॅन म्हटलं म्हणून ती नाहीशी होतात का?” … Read more

Girish Mahajan : “थकून घरी गेल्यावर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा”, गिरीश महाजनांचे खळबळजनक वक्तव्य

Girish Mahajan :  राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भडगाव (Bhadgaon) येथे झालेल्या जाहीर सभेत बांधकाम कामगारांसाठी उपलब्ध सरकारी योजना संदर्भात एक मनोरंजक आणि चर्चेचा मुद्दा निर्माण करणारे वक्तव्य केले. सभेत त्यांनी कामगारांना दिलेल्या सुविधा यादीत मच्छरदाणीचा उल्लेख करत मिश्कील सल्ला दिला, “थकून घरी आलात तर मच्छरदाणीत बायकोसोबत झोपा,” असे महाजन यांनी सांगितले. … Read more

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघतोय, हा मतांचा सौदा आहे का? भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा स्फोट; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

Uddhav Thackeray: राज्यात निवडणुकांचं वादळ जोर धरत असतानाच पैशाच्या उधळणीचा उघडपणे खेळ सुरू असल्याचा तीव्र आरोप शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. “मतांच्या हक्कावर पैशाचा धूर कसा उठतोय? हे मतदान आहे की बाजारात चाललेला लिलाव?” असा तडक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, सत्तेचा दर्प इतका वाढलाय की लोकांच्या अडचणी, शेतकऱ्यांची वेदना … Read more

Nilesh Rane: भिजलेला माणूस कुणाला घाबरत नाही, धमकी काय देता, जे काय करायचं ते करून टाका; निलेश राणे

Nilesh Rane: शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी 26 नोव्हेंबर रोजी मालवणमधील भाजपचे पदाधिकारी विजय किनवडेकर (Vijay Kinwadkar) यांच्या राहत्या घरी धाड टाकली. या वेळी त्यांच्या घरी अवैध पद्धतीने साठवलेली मोठी रोख रक्कम सापडली. खोलीत हिरव्या पिशवीत अंदाजे 25 लाख रुपये आढळले, अशी माहिती निलेश राणे यांनी दिली. यावेळी त्यांनी रवींद्र चव्हाण … Read more

Ajit Pawar: लव्ह मॅरेज झालंय का ?, महिला उमेदवाराला अजित पवारांचा थेट सवाल, मंचरच्या सभेत नेमकं काय घडलं?

Ajit Pawar: पुणे जिल्ह्यातील मंचर (Manchar) नगरपंचायत निवडणुकीला रंग चढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका अनपेक्षित प्रश्नाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मंचरमध्ये आयोजित सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले (Monika Bankhele) यांना संबोधित करताना त्यांनी थेट विचारले, “लव्ह मॅरेज झालंय का काय?” मोनिका बाणखेले यांचे माहेर आणि … Read more

Dhananjay Munde : “खासदाराचं पोट दुखतय, तुतारी वाजवणं हे त्यांचं काम” , धनंजय मुंडेंचा बजरंग सोनावणेंवर जोरदार प्रहार

Dhananjay Munde : परळीत झालेल्या सभेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंचावरून भावनिक आणि आक्रमक भाषण करत आपल्या मतदारांना दिलेलं प्रेम, केलेलं काम आणि स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांवर थेट भाष्य केलं. “विधानसभा निवडणुकीनंतर मला इथे पुन्हा सभा घ्यावी लागेल अशी कल्पनाही नव्हती, पण तुम्ही दाखवलेला स्नेह आयुष्यभराचं देणं आहे. सात जन्म घेतले तरी हे ऋण … Read more

Santosh Bangar : संतोष बांगर यांच्या घरी 100 पोलिसांची कारवाई, गुंडाच्या अड्ड्यासारखी झाडाझडती; हेमंत पाटलांचा भाजप आमदारावर गंभीर आरोप

Santosh Bangar: हिंगोलीमध्ये राजकीय ताप वाढत असताना, शिवसेना आणि भाजपच्या दरम्यान जोरदार वाद पुन्हा एकदा जागे झाला आहे. या पार्श्वभूमीवर, विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या पक्षाच्या सहकारी आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या घरावर पहाटे पाच वाजताच्या सुमारास सुमारे 100 पोलिसांनी धाड टाकली आणि त्यांची जबरदस्त झाडाझडती … Read more

Rupali Chakankar : भाजपचे नेते म्हणाले तिजोरीचा मालक आपला, आता रुपाली चाकणकर रणांगणात; म्हणाल्या, ‘अर्थमंत्रीही आपलाच, तिजोरीच्या चाव्या देखील आपल्या हातातच’

Rupali Chakankar: राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष सध्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजना असो किंवा तिजोरीच्या चाव्या, कोणाकडे नेमका अधिकार आहे यावर राजकीय नेत्यांमध्ये वाद चिघळला आहे. या सगळ्या गोंधळामुळे जनतेत मात्र संभ्रम निर्माण झाला असून खऱ्या अर्थानं तिजोरीची चावी कोणाकडे आहे? असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर महिला … Read more