BMC Election : मुंबईचा पुढचा महापौर कोणत्या पक्षाचा? पोलमध्ये 73 टक्के युजर्सचं एकमत, मराठी माणसाचा कल…

BMC Election : मुंबई (Mumbai) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, शिवसेना (Uddhav Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) या दोन मराठी पक्षांच्या संभाव्य युतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे मराठी मतदारांचा कौल पुन्हा एकत्र येणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई महापालिका ही केवळ देशातील सर्वात श्रीमंत … Read more

Aditya Thackeray : एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच भडकले

Aditya Thackeray : शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मागील दोन दिवसांपासून रंगत असलेल्या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतःहून प्रवेश करत टीका केली. यावरून आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी संताप व्यक्त करत म्हटलं की, “शिंदेंनी किमान लाज ठेवून टीका करायला हवी.” हिवाळी … Read more

Beed News: ‘…तर महाराष्ट्र बंद’, संतोष देशमुख हत्या तपासावरून मनोज जरांगेंचा सरकारला कडक इशारा

Beed News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील तत्कालीन सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्षपूर्ती होत असताना, या प्रकरणात पुन्हा एकदा नवा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाचे प्रमुख चेहरे असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पीडितांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची चौकशी केली आणि सरकारवर ताशेरे ओढत परिस्थिती आणखी गंभीर असल्याचे स्पष्ट केले. भेटीदरम्यान त्यांनी एका … Read more

Nilesh Chandra On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे नेते गद्दार, योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करा, महाराष्ट्रातील सफाई होईल; जैन मुनी निलेश चंद्रांची थेट टीका

Nilesh Chandra On Devendra Fadnavis : दादर (Dadar) परिसरातील कबुतरखान्याच्या वादानं तापलेल्या वातावरणात जैन मुनी निलेश चंद्र (Nilesh Chandra) यांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त करत सनातनी समाजाच्या मुद्द्यांवर थेट भाष्य केलं. त्यांच्या मते, जैन समाज हा हिंदू परंपरेचा अविभाज्य घटक असून शांततेचा मार्ग स्वीकारूनही त्यांच्यावर अन्याय केला जातो. निवडणुकीच्या काळात मुद्दाम मराठी विरुद्ध जैन असा … Read more

Kalyan Dombivli Mahanagarpalika Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के ढासळणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य

Kalyan Dombivli Mahanagarpalika Election: कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivli) महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांत भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) यांच्यातील नातं पूर्णपणे तडे जाईल का, अशी चर्चा रंगत आहे. कारण रविवारी झालेल्या कार्यक्रमात रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केलेल्या सूचक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यांनी थेट युती तुटेल असं न सांगता, कमळ … Read more

Eknath Shinde: दिल्लीतील शहा–शिंदे भेटीत उलगडला ‘ठाकरे प्लान’चा गुंता? कोण कोणाचा डाव उधळतंय, पडद्यामागील हालचालींनी वाढली उत्सुकता

Eknath Shinde: महायुतीमध्ये वाढणाऱ्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. जवळपास पन्नास मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर राज्यांच्या नेत्यांना इतका वेळ देत नाहीत, मात्र शिंदे यांना शहा वेळ देतात, यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, … Read more

Eknath Shinde : एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस यांच्यात वाढता अबोला? शिंदे भाईंचं गणित काही जुळेना, देवाभाऊंशी नेहमीसारखी बोलणी सुरूच होताना दिसेना

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातील दुरावा अधोरेखित होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या नेतृत्वाखाली बालेकिल्ल्यात सुरू असलेल्या कथित फोडाफोडीच्या हालचालींवर नाराजी व्यक्त करण्यासाठी शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला होता. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री … Read more

Eknath Shinde Meets Amit Shah: एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे फडणवीस व चव्हाणांविषयी नाराजी; उद्धव ठाकरेंचाही केला उल्लेख, दिल्लीतल्या बंद खोलीत काय ठरलं?

Eknath Shinde Meets Amit Shah: दिल्लीतील वातावरण काल विशेषतः राजकीय चर्चांनी तापले होते. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेऊन गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या पक्षांतर्गत नाराजीची सविस्तर माहिती दिल्याचं समोर येत आहे. मंत्र्यांच्या असंतोषानंतर शिंदे यांनी शाह यांच्यापुढे अनेक मुद्द्यांचा … Read more

Supriya Sule & Devendra Fadnavis: बिहारच्या निकालाची गडबड सुरू असताना महाराष्ट्रात अनपेक्षित हालचाल, सुप्रिया सुळे अचानक वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांना भेटायला, नेमकं कारण काय?

Supriya Sule & Devendra Fadnavis: बिहार निवडणूक निकाल (Bihar Election Result) जाहीर होण्याच्या तोंडावर संपूर्ण देशाचं लक्ष तिकडे लागलेलं असताना महाराष्ट्रात अनपेक्षित राजकीय हालचाल पाहायला मिळाली. शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीच्या प्राथमिक आकडेवारीत एनडीए आघाडीस निर्णायक बहुमत मिळण्याची चिन्हं दिसत होती. भाजप आणि जनता दल युनायटेड (JDU Party) या दोन पक्षांच्या वाढत्या आघाड्यांमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण … Read more

Bacchu Kadu : कोकणातील राजकारणात प्रहारची धडक! बच्चू कडूंची रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत एंट्री, निवडणूक आयोगावरही संतापाचा सूर

Bacchu Kadu : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. 246 नगरपरिषदां आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून (10 नोव्हेंबर) सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता कोकणातील राजकारणात एक नवी हलचल झाली असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) … Read more