पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची संपत्ती झाली उघड; संपत्तीचा आकडा पाहून डोळे पांढरे होतील

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडाकेबाज पोलीस आयुक्त, “आयर्नमन”, अशी आयपीएस कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठविण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं … Read more

ठाकरे सरकारवर आता दिल्लीतून हल्ला? तुरूंगातून सुटल्यावर राणा दाम्पत्य थेट दिल्लीला रवाना

मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याच्या अट्टाहासामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि  पती आमदार रवी राणा यांची अखेर सुटका झाली आहे. राणा यांना मुंबई सत्र  न्यायालयाने बुधवार (४ मे) रोजी  जामीन मंजूर केला. गुरूवारी सकाळी जामिनाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राणा दाम्पत्याला तुरुंगातून सोडण्यात आले . मागील १४दिवसांपासून दोघेही तुरुंगात होते. दोघांनाही राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक … Read more

युपीत १३ वर्षीय बलात्कार पिडीतेवर पोलिसानेही केले अत्याचार; नोबेल विजेते सत्यार्थी भडकले, योगींना म्हणाले..

कैलाश सत्यार्थी हे सतत समाजाच्या भल्यासाठी आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा देत असतात. ते भारतीय बालहक्क चळवळकर्ते व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते आहेत. उत्तर प्रदेशमधील ललितपूर पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या घटनेवर त्यांनी पुन्हा तीव्र शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये ललितपूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बलात्काराची तक्रार देण्यासाठी आलेल्या १३ … Read more

UPSC चे माजी सदस्य आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना लाच घेताना रंगेहात पकडले

केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राजस्थान लोक सेवा आयोगाच्या निवड समितीचे सदस्य, तसेच राजस्थान येथील कोटा  टेक्निकल विद्यापीठाचे कुुलगुरू डॉ. रामअवतार गुप्ता  यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. कोटा तांत्रिक विद्यापीठाच्या अखत्यारित तब्बल ३०० महाविद्यालय येतात. यातीलच एका महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या जागा वाढवण्यासाठी गुप्ता यांनी १० लाख रुपये लाचेची मागणी केली … Read more

दिल्लीतील मोफत विजेची सर्वांना मिळणारी सुविधा बंद; केजरीवालांनी घेतला मोठा निर्णय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्लीवासियांना सरसकट १०० युनिट मोफत विजेवरील सबसिडी काढून घेण्यात आली आहे . यामुळे गेली काही वर्षे मोफत वीज वापरणाऱ्या दिल्लीकरांना जोरदार फटका  बसला आहे . केजरीवाल यांनी  मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले . यामध्ये त्यांनी दिल्ली स्टार्टअप नितीला मंजुरी दिली … Read more

पुन्हा टॉलिवूडने बॉलिवूडला झोपवलं, KGF 2 ने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ४ था चित्रपट

प्रशांत नील दिग्दर्शित KGF2 या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यशसोबत संजय दत्त आणि रवीना टंडन या बॉलिवूड कलाकारांच्याही भूमिका आहेत. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर १’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. कन्नड, तमिळ, तेलुगू आणि हिंदी अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला अभिनेता यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ: चाप्टर 2’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर … Read more

राजेंद्र पवारांचा कृषीरत्न पुरस्कार स्विकारण्यास नकार; राज्यपालांवर केले ‘हे’ गंभीर आरोप

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे पुतणे व डॉ . आप्पासाहेब पवार यांचे पुत्र, आणि   कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे वडिल राजेंद्र पवार यांना डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०१९ जाहीर झाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा ”कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य” केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार आहे. २०१९ चा हा पुरस्कार बारामती अॅग्रीकल्चरल … Read more

ऋतुराजचे राज! गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत १२ चेंडूत ठोकल्या ६० धावा; पाहा धडाकेबाज खेळी

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने  चेन्नई सुपर किंग्सच्या  नेतृत्वाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे सोपवली होती. पण, धोनीचा हा निर्णय फसलेला दिसला. गतविजेत्या चेन्नईला ८ सामन्यांत केवळ दोन विजय मिळवता आले आणि जडेजाला कर्णधारपदाचा भार झेपत नसल्याचे दिसले. त्यामुळे धोनीच प्रत्यक्ष मैदानावर नेतृत्व करताना दिसला. रवींद्र जडेजाने अखेर चेन्नईचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने ही जबाबदारी … Read more

‘वा राजसाहेब वा! आज आम्ही सुखावलो, बऱ्याच काळाने मतपेटीचा विचार न करता निर्भयपणे..;

शरद पोंक्षे हे मराठी चित्रपट, नाटक, दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेते आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील एक प्रतिभावंत कलाकार म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. नाट्यसृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीरित्या साकारणारे अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यामुळे त्यांना मानणारा एक वेगळा … Read more

“मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गळ्यात हिरवा साप बांधण्यापेक्षा भगवी शाल महत्वाची”

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथील सभेची गेल्या १० दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. कल संध्याकाळी झालेल्या या सभेत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच भुजबळ आणि मिटकरींवर देखील  तीव्र शब्दांत  निशाणा  साधला आहे. काय म्हणाले प्रकाश महाजन मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी गळ्यात हिरवा साप बांधण्यापेक्षा भगवी शाल ही महत्त्वाची आहे, अशा शब्दांत मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी … Read more