Pravin Gaikwad attack: प्रविण गायकवाड हल्ल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, काय म्हणाले नेते?

Pravin Gaikwad attack: अक्कलकोट (Akkalkot) येथे रविवारी घडलेल्या घटनेने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर काही अज्ञात इसमांनी काळी शाई फेकून हल्ला केला. फत्तेसिंह शिक्षण संस्था (Fattesingh Shikshan Sanstha) आणि सकल मराठा समाज यांच्या कार्यक्रमासाठी ते अक्कलकोट येथे आले असताना त्यांच्या वाहनासमोर … Read more

Maratha Kranti Morcha : मराठा मोर्चा समन्वयक रमेश केरेंनी फेसबूक लाईव्ह दरम्यान प्यायले विष; धक्कादायक कारण आले समोर

Ramesh Kere

Maratha Kranti Morcha : नुकतीच राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या बाबतीत ही … Read more

मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आरोपांना संभाजीराजेंचं उत्तर; म्हणाले, ‘नाचक्की करणार असाल तर सहन करणार नाही..’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात बोलणं झालं नाही, तसेच आम्हाला तिथे काही बोलू दिलं नाही असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केला. तसेच संभाजीराजे छत्रपती यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका देखील त्यांनी घेतली. मराठी क्रांती मोर्चाने केलेल्या या आरोपांवर आता संभाजीराजे छत्रपती यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी फेसबुक … Read more

छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व मान्य नाही, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नेमकं काय घडलं?

नुकतीच छत्रपती संभाजी राजे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र, या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बैठकीत मराठा आरक्षणावर काहीही चर्चा झाली नाही यावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री … Read more

संभाजीराजेंना शिवसेनेची ४२ मते देणार होतो, पण आता…; संजय राऊतांनी आरोप फेटाळत स्पष्टच सांगितलं

sanjay raut

‘शिवसेनेच्या कोट्यातील एक जागा आम्ही संभाजीराजे छत्रपतींना देण्यासाठी तयार झालो. तो छत्रपतींचा सन्मान राखण्यासाठी त्यांच्या घराण्याचा सन्मान राखण्यासाठी. यापेक्षा अधिक शिवसेना काय करु शकते? हे सांगा,’ असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊत याबाबत माध्यमांशी बोलत होते. संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.  संभाजीराजेंना शिवसेनेने डावल्यानंतर राजकारण … Read more

‘संजय राऊत यांचा सत्तेचा माज महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता उतरवेल’

sanjay raut

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सुरू असलेल्या चर्चाना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेने राज्यसभेच्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेना नेते संजय पवार यांची घोषणा केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच ती घोषणा करण्यात येणार आहे. या जागेवर शिवसेना संभाजीराजे यांना पाठवेल अशी चर्चा होती. संभाजीराजेंना डावलून शिवसेनेने संजय पवारांना ही राज्यसभेची उमेदवारी दिली आहे, असे म्हटले … Read more

मराठा क्रांती मोर्चाने गुणरत्न सदावर्तेंना हिसका दाखवलाच! पुण्यात पोलिस ठाण्याबाहेर प्रचंड राडा

सध्या वकील गुणरत्न सदावर्ते वेगवेगळ्या अडचणींच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आज सदावर्ते चौकशीसाठी पुण्यात आले असताना त्यांचा मराठा क्रांती मोर्चा संपुघटनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. यावेळी सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजी करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याबाहेर चांगलाच राडाही घातला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी एका गुन्ह्यासंदर्भातील चौकशीसाठी सदावर्ते पुण्यात आले होते. मात्र सदावर्ते पोलीस ठाण्यात … Read more

राजकारणात खळबळ! मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा; ‘या’ मागणीसाठी थेट मंत्रालयात धडक

सध्या मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आक्रमक होताना दिसत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयात ठिया आंदोलन केलं आहे. मुख्यमंत्री आणि मंत्री भेटत नाही तोपर्यंत मंत्रालय सोडणार नसल्याचा त्यांनी इशारा दिला आहे. अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी मराठा क्रांती मोर्चाने हे आंदोलन केलं आहे. 2014आणि 2019 मधल्या मराठा आरक्षणाच्या नियुक्त्या कधी देणार? असा सवाल करत … Read more