…तर आम्ही पुन्हा शिवसेनेत यायला तयार; शिवसेनेच्या बंडखोर माजी मंत्र्यांचा दावा

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. त्यानंतर अनेक घडामोडी राजकीय वर्तुळात घडताना दिसत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर शिंदे गटात सामील होणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. राज्यातील घडामोडींवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी घेतलेला निर्णय हे बंड नाही, गद्दारी … Read more

‘राज्यपाल, हे काय सुरू आहे?’; राज्यघटनेचा दाखला देत राऊतांचा थेट कोश्यारींना सवाल

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. सरकारमध्ये १६० पेक्षा अधिक आमदार असून देखील मंत्रिमंडळ विस्तार अजून होत नसल्याने विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याची दखल घेत आता राज्यपालांना सवाल केला आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी लिहिले आहे की, … Read more

बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी चालेल, पण…; एकनाथ शिंदेंनी फोडली डरकाळी

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे आता शिंदे गट आणि शिवसेना यांचा वाद टोकाला गेला आहे. दोन्हींकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आता एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी बंडखोर आमदार आणि शिंदे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती.  संजय … Read more

संजय राऊतांनी संशय घेतलेले ‘ते’ तीनही आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर; राजकारणात खळबळ

विधान परिषद निवडणूक उद्या म्हणजेच २० जूनला होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रावादी काॅंग्रेसने काल ट्रायडेंटमध्ये आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत यांनी संशय घेतलेले आमदार देखील उपस्थित होते, त्यामुळे सध्या या बैठकीची चर्चा होत आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आदी … Read more

शरद पवारांनी दटावताच संजय राऊतांची पलटी; ज्या आमदाराला गद्दार म्हटले त्याचेच केले कौतूक

नुकताच राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये शिवसेनेचा पराभव झाला. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना काही अपक्ष आमदारांनी शिवसेनेला दगा दिल्याचा आरोप केला. त्यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या नावाचा देखील समावेश होता. संजय राऊत यांनी देवेंद्र भुयारांचे नाव घेतल्यानंतर घडामोडींना वेग आला. भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची … Read more

भाजपने जागा नक्की जिंकली पण त्यांचा विजय झाला असे मी मानत नाही – संजय राऊत

राज्यसभेसाठी सहाव्या जागेची अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. हा पराभव म्हणजे सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, भाजपने नक्कीच जागा जिंकली, परंतु त्यांचा विजय … Read more

“भाजपच्या कारस्थानाचा मुखवटा शाहू महाराजांनी फाडला”

udhav

राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांचे आभार मानले आहेत. ‘शाहू छत्रपती महाराजांनी शिवसेनेला बदनाम करणाऱ्या भाजपचा मुखवटा फाडला, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते याबाबत प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील वातावरण चांगलच तापलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा आरोप … Read more

ठाकरेंची ऑफर, राजेंचा नकार? संभाजीराजे यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार, वाचा नेमकं काय घडलं

सध्या राजकीय वर्तुळात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चर्चा सुरू आहे. ‘उद्या दुपारी १२ वाजता शिवबंधन बांधण्यासाठी मातोश्रीवर या,’ असा निरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांकडे छत्रपती संभाजीराजेंना देण्यासाठी निरोप पाठवल्याची बातमी आता समोर येत आहे. यामुळे आता संभाजीराजें उद्या (सोमवार) शिवबंधन बांधणार का? याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागले आहे. अशातच एक महत्त्वाची बातमी … Read more

तो खुप लढवय्या माणूस, मागे हटणार नाही; राऊतांनी केले भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचे कौतूक

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलंच गढूळ झालं आहे. मनसे, भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोपप्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. त्यातच भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला केलेल्या विरोधामुळे राजकारण अधिक तापलं. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला केलेल्या विरोधावर आता शिवसेना खासदार … Read more

शरद पवारांच्या गुगलीनंतर शिवसेनेने घेतला मोठा निर्णय; संभाजीराजेंची राज्यसभेची वाट बिकट!

udhav

राज्यसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. लवकरच राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ३ मे ला संपला. त्यानंतर त्यांनी थेट माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती कोणत्या … Read more