Raj thackeray : राज ठाकरेंनी फडणवीसांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्रावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनात वेगळीच शंका

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून या पत्राबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे. भाजपला पाठवण्यात आलेल्या या पत्रात राज ठाकरे यांनी लिहिले की, आमदार रमेश लटके यांच्या … Read more

Raj thackeray : ‘शिवनेरीवर गेलो असता अचानक अंधारातून खांद्यावर हात आला अन…’; राज ठाकरेंनी सांगितला खास किस्सा

लवकरच ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला आवाज दिला आहे. या निमित्ताने त्यांची अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी एक किस्सा सांगितला, ज्याची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा होत आहे. राज ठाकरे यांनी यावेळी १९९४ चा शिवनेरिवरचा एक किस्सा सांगितला … Read more

Raj thackeray : “जेव्हा जेव्हा अशी कीड तयार होईल तेव्हा…” अमित शाहांना टॅग करत राज ठाकरेंची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना चर्चेत आली आहे. या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला आहे. त्यावर आता देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं … Read more

Uddhav thackeray : ‘मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना संपवायची आहे’; उद्धव ठाकरे म्हणतात ‘तो’ मुन्नाभाई नेमका आहे तरी कोण?

राज्यातील सत्तातरानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटात सत्तासंघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर सातत्यानं आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. सभा आणि मेळाव्यामधून एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईतील शिवसेनेच्या सर्व गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. … Read more

‘बाळासाहेबांनी मिठी मारली आणि म्हणाले…’ राज ठाकरेंनी सांगितला शेवटच्या भेटीचा प्रसंग

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सडकून टीका केली. तसेच शिवसेना सोडताना झालेल्या घडामोडी आणि बाळासाहेबांच्या घेतलेल्या भेटीबाबत भाष्य केले. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडताना घडलेल्या घडामोडींदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या झालेल्या भेटीबाबत भावूक आठवण सांगितली. राज ठाकरे म्हणाले, मी केले ते … Read more

आगामी निवडणुकांसाठी दृष्टीने राज ठाकरे ऍक्टिव्ह; नाराज वसंत मोरेंना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात मनसेने देखील आपली तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते, सरचिटणीस यांची नुकतीच एक महत्वपुर्ण बैठक घेतल्याचं समोर आलं आहे. माहितीनुसार, या बैठकीनंतर मनसेनं विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यात पुणे ग्रामीण भागातील शिरूर, मावळ आणि बारामती … Read more

राज आणि उद्धव एकत्र येणार? शर्मिला ठाकरे यांनी दिलेल्या उत्तरामुळे चर्चेला उधाण

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी बंडखोरी करत भाजप सोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन झालं. या सर्व प्रकरणाचा शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असे दोन गट पडले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला याचा मोठा धक्का बसला. … Read more

अमित ठाकरे यांना शिंदे सरकारमध्ये मिळणार मंत्रिपद? राज ठाकरे म्हणाले, या पूर्ण प्रक्रियेत मनसेचा…

राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्री होण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली आहे. सध्या मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आहेत. असे असतानाच, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या … Read more

उद्धव आणि राज पुन्हा एकत्र? राजकीय पेचात अडकलेल्या रामाला मिळणार लक्ष्मणाची साथ, चर्चेला उधाण

शिवसेनेच्या ४० हुन अधिक आमदारांनी बंड केल्यानं शिवसेना अडचणीत सापडली आहे. शिवसेना हा पक्ष ठाकरेंच्या हातून हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज ठाकरे यांना शिवसेना सोडावी लागली, हा इतिहास महाराष्ट्र जाणतो. मात्र आता स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना … Read more

‘अरे मला जगू द्याल की नाही’ म्हणत राज ठाकरे पत्रकारांवर भडकले; जाणून घ्या नेमकं काय घडलं

१. ‘अरे जगू द्याल की नाही’; राज ठाकरे पत्रकारांवर भडकले २. ‘ऐ लाईट बंद करा रे, काही जगू द्याल की नाही’; राज ठाकरे पत्रकारांवर संतापले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संघटनबांधणीसाठी आणि पुणे महानगरपालिका निवडणूकीची रणनिती आखण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरे हे पुण्याच्या बाजीराव रस्त्यावर पुस्तकं खरेदी … Read more