Bollywood: फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांवर तब्बूची विचित्र प्रतिक्रिया, म्हणाली, कलाकारांनी टेंशन घेऊ नका कारण..

बॉलीवूड(Bollywood): सध्या बॉलीवूड मधील अनेक चित्रपट फ्लॉप होत आहेत. अलिकडे आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला समाजातून खूप विरोध झाला. त्यामुळे फ्लॉप झालेल्या सिनेमांबद्दल अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी आपले मत मांडले आहे. बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. त्यात तिने फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

तब्बूने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, मी याचा जास्त विचार करत नाही. मला वाटतं की कलाकारांनी ताण घेण्याची गरज नाही. एखाद्याचे करिअर चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे संपत नाही. या गोष्टींमध्ये आम्ही नशीबवान आहोत. कारण आमचे पैसे चित्रपटात गुंतवले गेले नाहीत. फक्त आपलं काम चांगलं असलं पाहिजे आणि चित्रपटही चांगला असायला हवा.

निर्मात्यांना बॉक्स-ऑफिसवरील आकड्यांबद्दल काळजी असते, पण हो तुमचा चित्रपट यशस्वी झाल्यावर होणारा आनंद वेगळाच असतो. तब्बूला जेव्हा विचारण्यात आले की, एखाद्या अभिनेत्याची ब्रँड व्हॅल्यू आणि बॉक्स ऑफिसच्या कमाईवर त्याची किंमत जाणून घेण्याचा अर्थ काय आहे? तर या प्रश्नावर तब्बूने उत्तर दिले की, ‘जेव्हा एखादा चित्रपट यशस्वी होतो तेव्हा प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने फायदा होतो. मात्र जर चित्रपटाला अपयश आले तर याचा त्रास नक्कीच होतो.

एखादा चित्रपट फ्लॉप झाला की अभिनेत्याचे करिअर लवकर संपते, असे मला वाटत नाही. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे काम मिळणे बंद होते, असेही नाही.’ तब्बूचा ‘भूल भुलैया 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अशी कामगिरी करणारा हा या वर्षातील पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

‘भूल भुलैया 2’ तब्बूच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. तब्बूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आगामी काळात अजय देवगणच्या ‘भोला’ आणि ‘दृश्यम 2’ या चित्रपटात दिसणार आहे. अंदाजांवर विश्वास ठेवला तर तब्बू ‘वीरे दी वेडिंग’च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या
Raj Thackrey: लालसिंग चढ्ढा फ्लाॅप झाल्यानंतर आमिरने घेतली राज ठाकरेंची भेट; काय आहे भेटीमागचे कारण…
अजितदादा विरोधातही फुल फाॅर्मात! पहील्याच प्रश्नात शिंदे सरकारची दांडी गूल
आता कंबोजांची खैर नाही! रोहित पवारांनी मांडली कुंडली, काकांसाठी पुतण्या मैदानात, वाचा नेमकं काय घडलं?
VIDEO: प्राजक्ता माळीनं दिलेलं चॅलेंज पुर्ण करता करता सई ताम्हणकरची वळली बोबडी