tabassum passes away because of heart attack | हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तबस्सुम यांचे निधन झाले आहे. तबस्सुम या ७८ वर्षांच्या होत्या. तबस्सुम यांना शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. आई तबस्सुम यांच्या निधनाबद्दल त्यांचा मुलगा होशांगने याबद्दल माहिती दिली आहे.
होशांगमे सांगितले की शुक्रवारी रात्री ८ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने आईचे निधन झाले. १९४७ मध्ये तबस्सुमने बेबी तबस्सुम नावाने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी एक प्रसिद्ध बालकलाकार म्हणून कामाला सुरुवात केली होती. एप्रिल २०२१ मध्येही तबस्सुम गोविल यांच्या निधनाची अफवा समोर आली होती. पण त्यांनी स्वत: ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. पण आता खरंच त्यांचे निधन झाले आहे.
तबस्सुम गोविल यांनी खरोखरच जगाचा निरोप घेतला असून त्यांच्या चाहत्यांसाठी या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. ही बातमी इंडस्ट्रीत आल्यानंतरच शोककळा पसरली आहे. तबस्सुमने १९४७ मध्ये आलेल्या ‘नर्गिस’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.
तबस्सुम मेरा सुहाग, मंझधर, बडी बहन आणि दीदारमध्ये दिसून आल्या होत्या. लता मंगेशकर यांनी गायलेले ‘बचपन के दिन भुला ना देना’ हे गाणे तबस्सुमवर चित्रित करण्यात आले होते. ‘बैजू बावरा’ या चित्रपटात तिने मीना कुमारीच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
काही वर्षे चित्रपटांतून ब्रेक घेतल्यानंतर तबस्सुमने पुनरागमन केले. त्यांनी भारतीय टेलिव्हिजनचा पहिला टॉक शो ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ होस्ट केला. हा शो २१ वर्षे (१९७२ ते १९९३) चालला. तबस्सुमने या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या होत्या, ज्यामुळे त्या लोकप्रिय झाल्या होत्या.
१९८५ मध्ये त्यांनी दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक म्हणून पहिला चित्रपट प्रदर्शित केला. त्याचे नाव होते तुम पर हम कुर्बान. २००६ मध्ये त्यांनी टिव्ही सिरियलमध्ये काम करण्यास सुरुवात केले होते. तबस्सुमने ‘रामायण’ मालिका फेम अभिनेता अरुण गोविलचा मोठा भाऊ विजय गोविलसोबत लग्न केले होते.
महत्वाच्या बातम्या-