Share

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये असं काय घडलं की संपूर्ण टीमला मागावी लागली माफी?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  हा शो दीर्घकाळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मनोरंजनासोबतच हा शो सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करतो. मात्र, नुकतीच या शोमध्ये एक चूक घडली. त्यामुळे सोशल मीडियावर या शोला ट्रोल करण्यात आले. तर वाढता वाद पाहून निर्मात्यांसोबत शोच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांची माफी मागितली आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊया.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या शोमध्ये सोमवारच्या भागात गोकुलधाम सोसायटीचे सदस्य एकत्र जमलेले असतात. म्यूझिकल नाईटसाठी सर्वजण एकत्र जमून जुन्या गाण्यांवर चर्चा करत असतात. यादरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं प्रसिद्ध ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्याबाबत चुकीची माहिती देण्यात येते.

शोमध्ये या गाण्याबाबत माहिती देत असताना सांगण्यात येते की, हे गाणं १९६५ मध्ये प्रदर्शित झालं होतं. त्यावेळचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी हे गाणं ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. परंतु, जाणकार नेटकऱ्यांनी गाण्याच्या प्रदर्शनाची तारीख चुकीचे सांगण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर मालिकेवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यास सुरुवात झाली. वाढता वाद पाहून शोच्या निर्मात्यांसोबत ‘तारक मेहता का उल्टा चश्मा टीम’तर्फे माफी मागण्यात आली. सोशल मीडियावर टीमद्वारे एक नोट शेअर करण्यात आला. यामध्ये लिहिण्यात आले की, ‘आम्ही आमचे प्रेक्षक, प्रशंसक आणि शुभचिंतकांचे माफी मागू इच्छित आहोत’.

‘आजच्या भागात आम्ही अनवधानाने ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं १९६५ या वर्षी प्रदर्शित झाल्याचं सांगितलं. परंतु आम्ही आमची चूक सुधारू इच्छित आहोत. हे गाणं २६ जानेवारी १९६३ रोजी प्रदर्शित करण्यात आलं होतं. आम्ही भविष्यात सावधान राहण्याचा वचन देत आहोत. तसेच अशी चूक पुन्हा घडणार नाही, याचे आश्वासन देतो. आम्ही तुमच्या समर्थनाचे आणि प्रेमाचे कौतुक करतो’.

महत्त्वाच्या बातम्या :
चार-पाच वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करतोय पण.., ‘लॉकअप’मध्ये अभिनेत्रीच्या खुलाश्याने प्रेक्षक भावूक
या’ निर्णयाने सामान्यांच्या खिशाला आणखी झळ तर रामदेवबाबा व अदाणींच्या संपत्तीत तुफान वाढ
दाक्षिणात्य चित्रपटांच्या यशामुळे बॉलिवूड हादरलंय, त्यामुळे.., मनोज वाचपेयीच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now