15 मे रोजी सकाळी माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सबाबत एक दुःखद बातमी समोर आली. ती बातमी म्हणजे, अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघात झाला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाने क्रीडा जगताला तसेच त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का बसला.
अँड्र्यू सायमंड्स सायमंड्सला क्रिकेटची खूप आवड होती. फक्त क्रिकेटच नाही तर बॉलीवूडवरही त्यांचे विशेष प्रेम होते. भारतात आल्यावर इथल्या संस्कृती आणि लोकांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असल्याचं त्याने सांगितले होते. बिग बॉस मध्ये देखील त्याने प्रवेश केला होता. बिग बॉस’ मध्ये प्रवेश करून त्याने सर्वांना वेड लावले होते.
अँड्र्यू सायमंड्सला अनेकजण पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून ओळखतात. पण अँड्र्यू सायमंड्सला बॉलीवूडची देखील खूप आवड होती हे तितकेच खरे आहे. माहितीनुसार, त्याने एका चित्रपटातही काम केले होते, त्यानंतर त्याच्यात हिंदी चित्रपटांत काम करण्याची इच्छा वाढली.
अँड्र्यू सायमंड्सने 2011 मध्ये ‘पटियाला हाउस’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात अँड्र्यू सायमंड्सने स्वतःची भूमिका साकारली होती. हा चित्रपट क्रिकेटवर आधारित होता, ज्यामध्ये अक्षय कुमारने मॉन्टी पानेसरपासून प्रेरित वेगवान गोलंदाजाची भूमिका साकारली होती.
अँड्र्यू सायमंड्सचा हा पहिलाच चित्रपट असला तरी शूटिंगदरम्यान तो सेटवर पूर्णपणे तल्लीन झाला होता. अक्षय व्यतिरिक्त, तो सेटवर शूट दरम्यान फावल्या वेळेत सहकलाकार ऋषी कपूर, अनुष्का शर्मा आणि डिंपल कपाडियासोबत खूप एन्जॉय करत होता.
एवढेच नाही तर, अँड्र्यू सायमंड्सने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर सलमान खानच्या रिअँलिटी शो ‘बिग बॉस’च्या 5 व्या सीझनमध्येही भाग घेतला होता. त्यादरम्यान तो शोमध्ये पाहुणा म्हणून आला आणि दोन आठवडे राहिला होता. बिग बॉसच्या घरात इंग्रजी बोलण्यास मनाई असली तरी अँड्र्यू सायमंड्सला सूट देण्यात आली होती.
त्यावेळी पूजा मिश्राला त्याच्यासाठी बिग बॉसच्या घरात अनुवादक म्हणून आणण्यात आले होते. बिग बॉसनंतर अँड्र्यू सायमंड्स ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’ मध्ये दिसला. त्यादरम्यान त्याने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूसोबत रंगमंचावर दमदार परफॉर्मन्स दिला होता.