Share

हवे तितके पैसे घ्या, पण माझ्या लेकराला सोडा; अपहरण केलेल्या चिमुकल्याच्या बापाची आर्त विणवणी

पुणे येथे बालेवाडी परिसरात एका चार वर्षीय बालकाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलेले असून अद्याप देखील त्याचा शोध लागलेला नाही. स्वर्णव चव्हाण असे या बालकाचे नाव असून पुणे शहरातील वेगवेगळ्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये या मुलाचे फोटो व्हायरल केले जात आहे. तसेच सदर मुलाबद्दल काही माहिती असल्यास संपर्काचे आवाहन ( मोबाईल 9822223683 ) देखील केलेले आहे.

बालेयाडी परिसरातून ११ जानेवारी रोजी मुलगा स्वर्णम याचे अपहरण अज्ञात व्यक्तींनी केले होते. ‘हवे तितके पैसे घ्या, मात्र माझ्या लेकराला सोडा, अशी आर्त विनवणी सतीश चव्हाण करत आहेत. याशिवाय, स्वर्णवला ताप आला असल्यास, त्याला कोणतं कफ सिरप द्यावं,’ याबद्दलही सतीश चव्हाणांनी माहिती दिली आहे.

तसेच माझा मुलगा डुग्गूबद्दल कुठलीही माहिती नाही. आम्हाला तो सापडला का, हे विचारायला कृपया फोन करु नका, कधी झालं, कसं झालं, अपहरण वगैरे वगैरे.. तुमच्याकडे कुठलीही माहिती असेल, तर प्लीज फोन करा, असं आवाहन सतीश चव्हाणांनी यांनी फेसबुक पोस्ट करून केलं आहे. सोबत त्यांनी स्वर्णव चव्हाण याचा फोटोही शेअर केला आहे.

दरम्यान, घटनेला तब्बल पाच दिवस उलटून गेले तरीदेखील अद्याप देखील या मुलाचा शोध लागलेला नाही. अपहृत बालकाचे कुटुंबीय यामुळे चिंतेत असून काही ठिकाणी मात्र या बालकाचा शोध लागलेला आहे, अशी अफवा पसरली आहे मात्र मुलाच्या वडिलांनी एक फेसबुक पोस्ट लिहून , ‘ कृपया आम्ही आमच्या बाळाचा अद्यापही शोध घेत आहोत तरी अफवा पसरवू नये. बाळाचा शोध लागल्यावर यासंदर्भात मी फेसबुक पोस्टवर सांगेन ‘, असे भावनिक आवाहन केलेले आहे.

स्वर्णव उर्फ डुग्गु वय वर्ष ४,  उंची ३ फूट, बांधा सडपातळ आहे. तर  केस -काळ्या सोनेरी रंगाचे असून वाढलेले आहेत, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा उभट, डोळे मोठे, पुढील ओठ मोठे, निळ्या रंगाचा शर्ट आहे. त्याच प्रमाणे तो मराठी आणि हिंदी भाषा बोलतो. स्वर्णव बद्दल किव्हा अनोळखी इसमाबद्दल काही माहिती आढळून आल्यास त्वरित संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, भाजप आमदार महेश लांगडे यांनीही  स्वर्णवचा फोटो जारी केला होता. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळणाऱ्या दुचाकीचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. स्वर्णव चव्हाण या मुलाचं काळ्या रंगाच्या अ‌ॅक्टिव्हा चालवणाऱ्या व्यक्तीनं अपहरण केल्याचा संशय आहे. त्यामुळं संबंधित व्यक्ती किंवा मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास आमदार महेश लांडगे यांच्याकडे किंवा मुलाच्या कुटुंबीयाकंडे संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
किरण माने यांच्या नवीन पोस्टने उडाली खळबळ; ‘काही दमच नाही रे आरोपांमध्ये…’
महाराष्ट्राने आधारवड गमावला, शेतकरी नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे निधन
पती की राक्षस! अनैसर्गिक सेक्स, सिगारेटचे चटके, न्यूड डान्स, मग मित्रांकडून केला सामूहिक बलात्कार…
किरण माने यांच्या नवीन पोस्टने उडाली खळबळ; ‘काही दमच नाही रे आरोपांमध्ये…’

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now