कर्नाटकमध्ये सुरु झालेल्या हिजाब वादाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. अनेक स्तरांतून या घटनेवर टीका करण्यात येत आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यादरम्यान नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने यावर तिची प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणावर तिचे मत मांडताना स्वराने हिजाब वादाला महाभारतातील द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी जोडले. त्यानंतर तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल (swara bhaskar trolled by netizens) करण्यात आले.
हिजाब वादावर प्रतिक्रिया देताना स्वराने ट्विट करत लिहिले होते की, ‘महाभारतात द्रौपदीचे जबरदस्तीने वस्त्रहरण करण्यात आले होते. आणि सभेत बसलेल्या जबाबदार, शक्तिशाली, कायदे बनवणारे बघत राहिले. असंच आज आठवलं’. सोशल मीडियावर अशाप्रकारे स्वराने हिजाब वादाची तुलना द्रौपदीच्या वस्त्रहरणाशी केल्याने तिला अनेक लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागले.
महाभारत में द्रौपदी के जबरन कपड़े उतारे गए थे.. और सभा में बैठे ज़िम्मेदार, शक्तिशाली, क़ानून बनाने वाले देखते रहे.. ऐसे ही आज याद आया।
— Swara Bhasker (@ReallySwara) February 14, 2022
स्वराच्या ट्विटवर कमेंट करताना एकाने लिहिले की, ‘द्रौपदीचे कपडे तर जबरदस्तीने काढण्यात आले होते. पण तू स्वतः तुझे कपडे काढले आहेत’. दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘हे लोक शाळेत जात आहेत की धार्मिक यात्रेला. हे जबरदस्तीने होत आहे’. अशात एका यूजरने तिचा एक फोटो शेअर करत तिने घातलेल्या छोट्या कपड्यांवरून प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर स्वराने या ट्रोलरला उत्तर देत यावर तिची प्रतिक्रिया दिली.
स्वराने लिहिले की, ‘हां.. मीच आहे आणि बॉम्ब दिसत आहे. धन्यवाद माझा हा फोटो शेअर केल्याबद्दल आणि जगाला आठवण करून दिल्याबद्दल की मी सुद्धा एक हॉटी आहे. मी महिलांना त्यांचे कपडे निवडण्याच्या अधिकाराबद्दल बोलत होते. तुम्हाला निवड कळतंय ना. कोणी नाही तुम्ही तर राहूद्या. तुम्ही करा दुसऱ्यांना स्लटशेम… त्यामध्येही नापास’.
https://twitter.com/ReallySwara/status/1493887828958138368?s=20&t=VHkdRZhluihU-jg8m24klA
काय आहे प्रकरण ?
काही दिवसांपूर्वी कर्नाटकमधील एका कॉलेजमध्ये हिजाब घातल्याने काही विद्यार्थींनीना वर्गात जाऊ देण्यात आले नाही. त्यानंतर या प्रकरणावरून मोठा वाद झाला. यावरून कॉलेजच्या बाहेरही प्रदर्शन झाला होता. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये मुस्कान नावाची मुलगी हिजाब घालून कॉलेजमध्ये येताना दिसून आली होती. त्यानंतर तिच्या मागे काही मुलांचा जमाव येत जय श्रीरामच्या घोषणा देत होते. तेव्हा मुस्काननेही ‘अल्लाह हु अकबर’च्या घोषणा देत मुलांना उत्तर दिले.
कर्नाटकमधील या वादाचे प्रतिसाद संपूर्ण देशभर उमटले. त्यानंतर हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला. देशात वाढत्या वादादरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे धार्मिक कपडे घालून शाळा किंवा कॉलेजमध्ये येण्यास मनाई केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
अशोक सराफ यांनी अनेक वर्षांपासून जिवापेक्षा जास्त जपली आहे ‘ही’ भाग्यशाली गोष्ट
आम्ही लग्नाळू! पतीने केली होती १३ लग्न, सत्य समोर येताच १४ व्या पत्नीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
अशोक सराफ यांनी अनेक वर्षांपासून जिवापेक्षा जास्त जपली आहे ‘ही’ भाग्यशाली गोष्ट