टीव्ही (TV) हे मनोरंजनाचे सर्वात मोठे माध्यम आहे. प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यातील तो एक अविभाज्य घटक बनला आहे. टीव्हीवरील वाहिन्यांवर दररोज अनेक मालिका आणि कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. याद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत असते. तर प्रेक्षकही आपल्या आवडत्या कलाकारांना भरभरून प्रेम देत असतात. मोठ्या पडद्याद्वारे कलाकारांना जेवढी प्रसिद्धी मिळते तेवढीच त्यांना छोट्या पडद्याद्वारेही मिळत असते.
सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी मोठ्या पडद्यापर्यंत मजल मारली. परंतु, असेही अनेक कलाकार आहेत ज्यांनी मोठा पडदा गाजविला असूनही छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहेत. आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकण्यासोबतच हे कलाकार टीव्ही मनोरंजनसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार ठरले आहेत. तर कोण आहेत हे कलाकार जाणून घेऊया.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता श्रेयस तळपदे, स्वप्निल जोशी, सचिन खेडेकर, उमेश कामत तसेच अभिनेत्री मुक्ता बर्वे हे मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार आहेत. तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
श्रेयस तळपदे –
श्रेयस तळपदे हा मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. पण मोठा पडदा गाजवल्यानंतर त्याने पुन्हा छोटया पडद्यावर पुनरागमन केले आहे. तो सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेतील त्याची यश ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडते. तर रिपोर्टनुसार श्रेयसने या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी जवळपास ४० ते ४५ हजार रूपये फी आकारली आहे.
स्वप्निल जोशी –
मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता स्वप्निल जोशी जवळपास ८ वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केला आहे. सध्या तो ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत दिसत आहे. स्वप्निल हा मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यापैकी एक आहे. रिपोर्टनुसार, त्याने ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेच्या एका भागासाठी ६० ते ७० हजार रूपये फी आकारत आहे.
मुक्ता बर्वे –
मुक्ता बर्वे ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मुक्ताने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाद्वारे ती नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकून घेत असते. मुक्ता सोनी मराठी वाहिनीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत उमेश कामतसोबत दिसली होती. तर रिपोर्टनुसार या मालिकेसाठी मुक्ताने चांगलीच फी आकारल्याचे वृत्त आहे.
उमेश कामत –
‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामतची जोडी दिसली होती. उमेशने रंगभूमी, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. त्याने दीर्घकाळानंतर ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेमध्ये पुनरागमन केले होते.
सचिन खेडेकर –
सचिन खेडेकर यांनी केवळ मराठी आणि हिंदीतच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. सिनेसृष्टीतील ते एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. सचिन खेडेकर यांनी मोठ्या पडद्यावर काम करत असतानाच ते छोट्या पडद्यावरील मराठीतील ‘कोण होणार करोडपती’ हा शो होस्ट केला होता. या शोसाठी त्यांनी एका भागासाठी ५० लाख रूपये घेतला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
एस एस राजामौली यांचे चित्रपट हिट होण्यामागचे खरे कारण आले समोर, वाचून आश्चर्य वाटेल
RRR चा धुमाकूळ! कमाईचा आकडा पाहून सलमान खानही झाला चकीत; म्हणाला..
पत्नीने घरी येण्यास नकार दिल्याने संतापला पती, सासरवाडीत फेकला बॉम्ब, असा स्फोट झाला की..