Share

२० वर्षांनंतर असा दिसतो ‘मुन्नाभाई MBBS’ मधला ‘स्वामी’, फोटो पाहून तुम्हालाही ओळखता येणार नाही

2003 साली प्रदर्शित झालेला संजय दत्तचा (Sanjay Dutt) चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा बॉलिवूडमधील सर्वात हिट आणि अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे. हा असा सदाबहार चित्रपट आहे, जो आजही लोकांना पाहायला आवडतो. या चित्रपटातील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. या चित्रपटात खुर्शीद लॉयर यांनी ‘स्वामी’ची भूमिका साकारली होती.(swami-from-munnabhai-mbbs-you-cant-even-recognize-it-by-looking-at-the-photos)

चित्रपटात दिसणारा सडपातळ स्वामी जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायला जातो तेव्हा त्याचा इन्ट्रो भाई म्हणजेच संजय दत्त घेतो हे तुम्हाला आठवत असेल. स्वामीचे काही नवीन फोटो म्हणजेच खुर्शीद लॉयरचे फोटो विरल भयानीच्या अधिकृत इन्स्टा पेजवरून शेअर केले आहेत, जे पाहून लोक त्यांना ओळखू शकत नाहीत.

संजय दत्ताच्या मित्राची भूमिका करणारा सडपातळ स्वामी 17 वर्षात खूप बदलला आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की, स्वामीचा लूक गेल्या काही वर्षांत पूर्णपणे बदलला आहे. स्वामीच्या चेहऱ्यावरून त्यांचे वय स्पष्ट दिसते. खुर्शीद लॉयर याचे हे फोटोज पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

स्टार फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, ‘तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित ‘द ग्रेट इंडियन मर्डर’ या वेब शोसह अभिनेता खुर्शीद लॉयर 4 वर्षांनंतर परतला आहे. प्रेक्षक नक्कीच त्याच्या पुढच्या प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.

द ग्रेट इंडियन मर्डरमध्ये, खुर्शीद श्रीमान दिवाण या मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका करत आहेत. याशिवाय तो ससुराल गेंदा फूल, बा बहू और बेबी, शरत यासारख्या टीव्ही मालिकांचाही भाग आहे आणि काही वर्षांपूर्वी तो शेवटचा निमकी मुखियामध्ये दिसला होता.

खुर्शीद लॉयर यांचे फोटोज पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, “स्वामींची भूमिका मस्त होती”. त्याचवेळी, काही यूजर्स कमेंट सेक्शनमध्ये मुन्ना आणि स्वामीचे डायलॉग लिहितानाही दिसले.

महत्वाच्या बातम्या-
बिहारमध्ये जेडीयू-भाजपचे सरकार कोसळणार? मुख्यमंत्री नितीश कुमार भडकले
बुम बुम बुमराहने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले अनोखे त्रिशतक
कॉमेडियन कृष्णाच्या बायकोने केली बोल्डनेसची हद्दपार; बिकीनीच्या त्या व्हिडिओने चाहते झाले घामाघूम
माझ्याकडे ७०० लोकांची दुखभरी कहाणी, कश्मीर फाईल्सवर वेब सिरीजही बनवणार; दिग्दर्शकाची घोषणा

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now