Share

एकीकडे भाऊ मृत्युशी झुंज देत होता तर दुसरीकडे ते माझ्यासोबत सेल्फी.., ‘या’ मराठी अभिनेत्याने सांगितले दु:ख

Swabhiman

‘स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा’ (Swabhiman) या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अक्षर कोठारी. मालिकेतील शंतनू या भूमिकेद्वारे अक्षरने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. यादरम्यान नुकतीच एका मुलाखतीत बोलताना अक्षरने त्याच्या आयुष्यातील वाईट प्रसंगाबद्दल भाष्य केला आहे. या वाईट प्रसंगांमुळे तो कित्येक रात्री जागून काढल्या, असेही त्याने म्हटले आहे.

अक्षरने नुकतंच हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. यावेळी बोलताना अक्षरने सांगितले की, २०१९ हे वर्ष त्याच्यासाठी खूप खडतर गेलं. पत्नीपासून वेगळे होणे आणि भावाचे आजारपण यामुळे तो खूप खचून गेला होता. कित्येक रात्री त्याने जागून काढल्या. पण या वाईट दिवसांनी त्याला खूप काही शिकवलं. या घटनांमुळे तो माणूस म्हणून परिपक्व झाला.

अक्षरने म्हटले की, ‘माझ्या भावाला एरिथमिया म्हणजे ह्रदयाचा अनियमित ठोक्याचा आजार होता. आणि त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. भावाला काही झाले तर काय होईल, या विचाराने मी कित्येक रात्र झोपू शकलो नाही. पण कलाकारांचं आयुष्य खूप वेगळं असतं. त्याच्या आयुष्यात काहीही घडलं तरी त्याला नेहमी हसतमुख राहावं लागतं’.

त्याने पुढे सांगितले की, ‘मला आठवतंय की, माझा भाऊ रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. पण रूग्णालयातील कर्मचारी मात्र माझ्यासोबत सेल्फीसाठी धावपळ करत होते. तेव्हा मला जाणीव झाली की, कलाकारांचं आयुष्य खूप वेगळं असतं. प्रत्येकालाच वाटत असते की, कलाकार हा नेहमी हसतमुख हसायला पाहिजे. पण त्या कलाकाराच्या आयुष्यातही अनेक वाईट प्रसंग येत असतात’.

अक्षरने म्हटले की, ‘पण माझ्या आयुष्यातील या सर्व वाईट घटनांनी मला खूप काही शिकवलं. मला एक चांगला कलाकार घडविण्यास मदत केली. प्रत्येक कलाकार कोणत्या ना कोणत्या वाईट प्रसंगातून गेलेला असतो. तेव्हाच तो उत्तम कलाकार बनतो’.

पुढे मनोरंजनसृष्टीतील आपल्या करिअरबाबत बोलताना अक्षरने म्हटले की, ‘अभिनेता होणे ही माझी निवड होती. मला या क्षेत्रात येण्यासाठी माझ्या कुटुंबीयांनी खूप मदत केली. पण त्यांना हे सर्व समजावून सांगायला आणि त्यांची परवानगी मिळवण्यासाठी मला पाच वर्ष लागली. भावाला गमावणे हे माझ्या कुटुंबीयांसाठी खूप कठिण होतं. पण आयुष्यातील हा संघर्ष माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांसाठी प्रेरक आहे, असे मी मानतो’.

महत्त्वाच्या बातम्या :
आलिया-रणबीरच्या लगीनघाईत समोर आली ऋषी-नीतू कपूरची ४२ वर्षांपुर्वीची पत्रिका, पहा फोटो
सलमान, शाहरूख आणि आमिरच्या ५ चित्रपटांना एका चित्रपटाने झोपवले, तुम्हीही म्हणाल, ‘डायरेक्टर नहीं फायर है’
‘अनुष्काभाभी…’ हाक मारत कामवालीने विराटला दिला गुंगारा, स्टेडियममधला भन्नाट VIDEO झाला व्हायरल

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now