नाशिक महापालिकेच्या मारेवाडी सिडको येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत असलेल्या डाॅ.सुवर्णा वाजे (suvarna waje) यांची हत्या त्याचेच पती संदिप वाजेने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक कलह अन् त्यातून सतत उडणारे खटके व वादविवादामुळे डॉ. सुवर्णा वाजे यांचा त्यांचा पती संदीप वाजे यानेच पूर्वनियोजित कट रचून हत्या केल्याचे समोर आले आहे.
सुवर्णा संदीप वाजे या मंगळवारी (दि.२५) रात्रीपासून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांच्या पतीने अंबड पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारही दाखल केली आहे. मात्र महामार्गालगत रायगडनगरजवळ वाजे यांची मोटार त्याच रात्री पुर्णपणे जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
तसेच गाडीच्या चेसिज क्रमांकावरून मोटार वाजे यांच्या मालकीची असल्याची खात्री पटली खरी मात्र मोटारीत मिळालेली जळालेली हाडे कोणाची? याचा उलगडा पोलिसांना होत नव्हता. यामुळे वाजे बेपत्ता की मृत्युमुखी याबाबतही पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा निष्कर्ष काढलेला न्हवता.
तर वैद्यकिय चमुकडून ती हाडे महिलेची आहेत, सांगण्यात आले होते. मात्र हाडे कोणत्या महिलेची हा प्रश्न होता. त्यामुळे डॉ. वाजे यांच्या वडिलांचा डीएनए नमुना संकलित करुन पोलिसांनी हाडे न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या तपासणी अहवालाची पोलिसांना आठवडाभरापासून प्रतीक्षा होती.
दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा आलेल्या या अहवालात वाजे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या डीएनए आणि जळालेल्या हाडांचा डीएनए एकसमान असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वाजे यांच्या माहेरच्या व्यक्तींनी पती याच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर नातेवाईकांच्या जबाबावरून गुरुवारी वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयित वाजे यास अटक केली.
याचबरोबर त्याच्यासह अन्य पाच संशयित साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा शोध घेतला जात आहे. वाडीवर्हे पोलिसांनी संशयित संदीप वाजे यांना ४ फेब्रुवारी या दिवशी अटक करून इगतपुरी न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
लता मंगेशकर यांची प्रकृती पुर्णपणे ठिक झाली होती, पण…; डॉक्टरांनी सांगितले लतादिदींच्या मृत्युचे खरे कारण
१००० पाकिस्तानही लता दीदींच्या जाण्याचं नुकसान भरून काढू शकत नाही, पाकिस्तानातून लता मंगेशकरांना श्रद्धांजली
वेस्ट इंडिजसोबतचा पहिला सामना जिंकताच भारतीय संघाने रचला इतिहास; वाचून वाटेल कौतूक
वर्ल्डकप जिंकल्याबद्दल BCCI कडून भारतीय संघाला मिळणार बंपर गिफ्ट; प्रत्येक खेळाडूला मिळणार ४० लाख अन्…