भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी प्रेम प्रकरण आणि पैशांच्या लालसेतून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत एका महिलेने तिच्या पतीची हत्या केली आहे.
ऋचा जैन या महिलेने तिचा पती सौरभ जैनची हत्या केली. तिच्या प्रियकराने यामध्ये तिला साथ दिली आहे. एका निर्जन स्थळी त्यांनी सौरभचा मृतदेह फेकला. तसेच खोटी माहिती देऊन पोलिसांची देखील दिशाभूल केली. मात्र नंतर पोलिसांनी याबाबत तपास केल्याने खरी माहिती समोर आली.
आता दोघांनी हत्येची कबुली दिली. सहा महिन्यांनी खुनाचा उलगडा झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी सौरभ जैनची हत्या झाली होती. ऋचाचे दीपेश भार्गवसोबत प्रेमसंबंध होते. ऋचा अनेकदा अशोकनगरहून पळाली होती.
तसेच सासरचे घर सोडून ती अनेकदा सिरोंजला जायची. तिकडे ती काही महिने राहिलीही होती. त्यानंतर ती पतीकडे परत गेली. ऋचाचे प्रेमसंबंध पती सौरभने स्वीकारले होते. मात्र यावरून अनेकदा वाद देखील होत होते.
सौरभच्या नावे असलेली जमीन विकण्यात आली. त्यातून सौरभला १२ लाख रुपये मिळाले. यातील साडे नऊ लाख रुपये सौरभनं बँक खात्यात जमा केले. याच पैशांच्या लालसेपोटी ऋचा आणि दीपेशने सौरभच्या हत्येचा कट रचला. त्याच्या खात्यातील ८ लाख रुपये दोघांनी काढले. एका निर्जनस्थळी दीपेशने सौरभच्या डोक्यावर दगडाने हल्ला केला. त्याची ओळख पटणार नाही याची काळजी घेतली.
सौरभचा मृतदेह तिथेच फेकला. दरम्यान, सहा महिने उलटल्यानंतर या प्रकरणात सौरभच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरुन ऋचा, तिचा प्रियकर दीपेश आणि लखनला आरोपी केले. तसेच ऋचा दीपेशसोबत तीर्थयात्रेला गेली होती. पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर खरी घटना समोर आली.