Share

शेतकऱ्यांच्या वीजतोडणीला स्थगिती; ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय

मुंबई | सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मागच्या अधिवेशनापासून शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेत राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी सर्व प्रश्नांची उत्तर देत शेतकऱ्यांसाठी खूप मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत शेतकऱ्यांची बाजू मांडत, वीज तोडणी ही तीन महिन्यांसाठी थांबवली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची तोडलेली वीज पूर्वीप्रमाणे चालू करणार असल्याचीही घोषणा उर्जामंत्र्यांनी यावेळी सभागृहात केली आहे.

पुढे, नितीन राऊत यांनी सांगितले कि, शेतकऱ्यांच्या हातात पीक येइपर्यंत वीज तोडणी थांबवली आहे. कृषी ग्राहकांना दिवसभरात वीज मिळावी यासाठी समिती नेमली आहे. ती समिती एक महिन्यात अहवाल देईल. अशी माहिती नितीन राऊत यांनी सभागृहात दिली आहे.

शेतकऱ्यांची वीज खंडित करण्यामागचे कारण देखील नितीन राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. मागच्या सरकारने वीज बिले दिले नाहीत. बँकेचे कर्ज असल्यामुळे महावितरनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करावा लागला होता.

दरम्यान, शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत सभागृहातही नाना पटोले तसेच विविध सत्ताधारी पक्षातील आमदारांनी, विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवला होता. तसेच अनेक ठिकाणाहून शेतकऱ्यांनीही आवाज उठवला होता आणि ही वीज तोडणी त्वरीत थांबवावी अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला आज सभागृहात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलासा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:
“शेतकऱ्यांवा दिवसा वीज न दिल्यास जनआंदोलन उभे करून ठाकरे सरकारला गुडघे टेकायला लावणार”
महागाई वाढली असताना गरिबांनी जगायचं कसं? केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे भडकल्या..
आजोबांच्या निधनाने भावूक झाली प्राजक्ता गायकवाड, म्हणाली, ‘सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ असं म्हणून सोडून गेलात’
काश्मिर फाईल्सने दुसऱ्या दिवशीही केली छप्परफाड कमाई, प्रभासच्या ‘राधे-श्याम’लाही टाकले मागे

 

 

इतर ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now