Share

VIDEO: पितळ उघडं पडताच सुष्मिताने ललित मोदींना दिला धोका, एक्स बॉयफ्रेंडचा पकडला हात

Sushmita Sen, Rohman Shaul, Lalit Modi,VIDEO/ बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदीसोबतच्या (Lalit Modi) अफेअरमुळे खूप चर्चेत आहे. ललित मोदींनी काही काळापूर्वी सोशल मीडियावर सुष्मितासोबतचे नाते अधिकृत केले होते. मात्र, सुष्मिताने अद्याप ललितसोबतच्या नात्याची पुष्टी केलेली नाही.

आता अलीकडेच माजी मिस युनिव्हर्सने तिचा माजी प्रियकर रोहमन शॉल आणि इतर कुटुंबातील सदस्यांसह तिच्या आईचा वाढदिवस साजरा केला. सोमवारी इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान सुष्मिताने फॅमिली सेलिब्रेशनच्या काही झलक चाहत्यांसोबत शेअर केल्या. सुष्मिता तिच्या आईसोबत इंस्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधत असताना, रोहमन पार्श्वभूमीत सुष्मिताच्या मुलींसोबत बोलताना दिसला.

https://www.instagram.com/reel/ChAY528JhYY/?utm_source=ig_web_copy_link

ललितसोबतच्या अफेअरच्या बातम्यांदरम्यान सुष्मिताच्या कौटुंबिक सेलिब्रेशनमध्ये रोहमनचे अशा प्रकारे आगमन झाल्याने चाहत्यांमध्ये मोठा प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतचे त्यांचे काही रोमँटिक फोटो ट्विटरवर शेअर केले होते. दोघेही डेट करत असल्याचे लोकांना सांगितले.

इतकेच नाही तर ललितने सुष्मिता सेनला बेटर हाफ सांगून लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले होते. पण नंतर सुष्मिता सेनने एका पोस्टद्वारे लग्नाची चर्चा नाकारली होती. सुष्मिता सेन आणि मॉडेल रोहमन शॉल 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. दोघेही अनेकदा त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रोमँटिक फोटो पोस्ट करताना दिसले.

मात्र, 4 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रोहमन आणि सुष्मिताचे ब्रेकअप झाले. अशा परिस्थितीत, सुष्मिताच्या फॅमिली फंक्शनमध्ये रोहमनच्या आगमनाने, सर्वांच्या नजरा आता दोघांकडे लागल्या आहेत. चाहत्यांचा अंदाज आहे की सुष्मिता आणि रोहमन पुन्हा एकदा पॅचअप झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
कोणाची संपत्ती आहे जास्त? ललित मोदी की सुष्मिता सेन? वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
मला तर बाप-लेक वाटतात सुष्मिता सेन-ललित मोदींच्या अफेअरवर अभिनेत्रीची धक्कादायक प्रतिक्रिया
ललित मोदींपूर्वी सुष्मिता सेन या 6 उद्योगपतींची होती गर्लफ्रेंड, एक तर 14 वर्षांनी लहान
सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये असलेले ललित मोदी नक्की आहेत तरी कोण? वाचा त्यांच्याबद्दल..

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now