sushma andhare on sanjay raut mother | शिवसेना नेते संजय राऊत यांना तब्बल १०० दिवसानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्यांना पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केली होती. ते गेल्या ३ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये होते. पण अखेर कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. ते तुरुंगातून आता घरी परतले आहे.
संजय राऊत सुटल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेक शिवसेना नेतेही यावर प्रतिक्रिया देत आहे. आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांच्या मातोश्री माँ जिजाऊचं रुप आहे, त्यांनी हिरा जन्माला घातला आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
शिवाजी जन्माला यावा, पण तो दुसऱ्याच्या घरी, असं सगळ्यांना वाटतं. पण शिवाजी आपल्या घरात असावा असं कुणाला वाटत नाही. संजय राऊतांच्या मातोश्री आमच्यासाठी आदर्श आहे. आमच्यासाठी माँ जिजाऊचं रुप आहे.त्यांनी असा हिरा जन्माला घातला आहे. जो प्रसंगी शिवसेनेसाठी कुर्बान होण्यासाठी सुद्धा तयार आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
सुनील राऊत किंवा शिवसेनेने कधीच आश सोडली नाही. मातोश्री किंवा शिवसेनेवरील विश्वास सोडला नाही. निष्ठा जराही डळमळल्या नाही. शिवसेना हे कुटुंब आहे. त्या कुटुंबातील राऊत हे एक भाग आहे. कठीण काळात एक-एक जण साथ सोडत होते. त्यावेळी जीवावर आल्यावरही राऊत खिंड लढवत होते, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंना काही पत्रकार खाजगीत भेटायचे आणि सांगायचे की संजय राऊतांना आवरा. तेव्हा राऊत गैरहजर असताना उद्धव ठाकरे पत्रकारांना म्हणायचे, संजयवर माझा पुर्णविश्वास आहे. माझा संजय माझ्यासाठी ठामपणे उभा राहिला आहे. माझा त्याला पुर्णपणे पाठिंबा आहे, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे.
अमृता फडणवीस यांनी शवसेना असा उल्लेख केला तेव्हा ४० जणांपैकी एकानेही उत्तर दिले नाही. राऊत एकाकी झुंज देत होते. माणसाच्या काही मर्यादा असतात. सातत्याने त्यांना डिवचत असाल तर चिचचिड होणे स्वाभाविक आहे. राऊतांचा सच्चेपणा उद्धव ठाकरेंना कळाला होता, त्यामुळे ते त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे होते, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Sanjay Raut : ईडीच्या कारवाईत भेदभाव, राऊतांना विनाकारण अटक झाली; न्यायालयाने ईडीला झाप झाप झापले
uddhav thackeray : जामीनानंतर उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना थेट फोन म्हणाले, संजय…
जिच्यावर विश्वास टाकला तिनेच धोका दिला! ठाकरेंची आक्रमक वाघिन शिंदे गटात सामील