Sushma andhare | दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची तर चर्चा तर होतीच पण आणखी एका महिलेच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ती महिला म्हणजे सुषमा अंधारे. सुषमा अंधारे आता शिवसेनेची धडाडणारी तोफ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.
सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणाने विरोधकांवर तर टीका केलीच पण शिवसैनिकांमध्ये जोशही कायम ठेवला. आज आम्ही तुम्हाला सुषमा अंधारे यांच्या कारकीर्दीबद्दल आणि त्यांच्या शिक्षणाबद्दल सांगणार आहोत. सुषमा दगडू अंधारे असे त्यांचे पुर्ण नाव आहे. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९८४ साली झाला होता.
पाडोली-कळंब या गावात त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या प्रभावशाली भाषणामध्ये त्यांच्या जीवनाचा खुप मोठा सहभाग आहे. दारिद्र्य, समाजव्यवस्था, चळवळीतील अनुभव हे सगळं पार करून त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत. सुषमा अंधारे ह्या लेखिकाही आहेत. तसेच त्या समाजशास्त्र, राज्यशास्त्र विषयाच्या व्याख्यात्या आहेत.
पुरोगामी स्त्रीवादी अभ्यासक, भटक्या विमुक्त व आंबेडकरी चळवळीतील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. सुषमा अंधारे या एकट्याच त्यांच्या घराण्यात शिकलेल्या आहेत. त्यांच्या आधी त्यांच्या घरात कोणीही शिकलेले नव्हते. त्या भटक्या विमुक्त समाजातून येतात.
लातूर जिल्ह्यातील मुरूड हे त्यांचं मुळ गाव आहे. याच गावात त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी बसवेश्वर कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. या ठिकाणी त्यांनी राज्यशास्त्रात एमए केलं. त्यानंतर उमरगा येथे त्यांनी बीएड केलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत असत.
शिवसेनेत येण्याआधी सुषमा अंधारे गणराज्य संघात काम करत होत्या. त्यांचे आजोबा कबीरपंथी होते. यावरूनच प्रेरित होऊन सुषमा अंधारे यांनी आपल्या मुलीचे नाव कबीरा ठेवले. सुषमा अंधारे यांना लहानपणी लाडाने रुबाब असं बोललं जायचं. हे खुप कमी लोकांना माहिती आहे की, सुषमा अंधारे शिक्षणासाठी घरातून पळून गेल्या होत्या.
त्यानंतर दहावीत पास झाल्यानंतर घरच्यांनी त्यांना ५१ रुपये बक्षिस म्हणून दिले होते. हेच पैसे घेऊन त्या लातूरला शिक्षण घेण्यासाठी पळून गेल्या होत्या. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेत त्यांनी बक्षिस म्हणून पैसे जिंकण्यास सुरूवात केली आणि त्याच पैशातून आपले शिक्षण पुर्ण केले.
महत्वाच्या बातम्या
Eknath shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना दणका! सेनेच्या १,२ नव्हे तर तब्बल ७ हेवीवेट नेत्यांवर गुन्हा दाखल
Deepak Lande : सत्तारानंतर शिंदे गटातील ‘हा’ बडा आमदार नाराज; म्हणाला, आम्ही काय फक्त नाश्ता करायचा का?
Vasant more : समाज ईतका संवेदनाहीन का झालाय? आता नुसते जागे होऊन चालणार नाही…
Terrorists: दोन गोळ्या लागूनही इंडियन आर्मीच्या ‘या’ कुत्र्याने केला दहशतवाद्यांचा खात्मा, वाचा कोण आहे ZOOM?