sushma andhare criticize dipak kesarkar | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक शिंदे गट आहे तर दुसरा गट ठाकरेंचा गट आहे. शिंदे गटात शिवसेनेचे ४० आमदार आहे आणि १२ खासदार आहे. तसेच त्यांच्या गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांची संख्याही वाढताना दिसत आहे.
४० आमदार आणि १२ खासदारांचे पाठबळ मिळाल्यामुळे आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे शिंदे गटाकडून वारंवार केले जात आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत, हिंदुत्वासाठी आम्ही भाजपसोबत आलो आहोत, असे शिंदे गटाचे नेते म्हणताना दिसून येतात.
अशात ठाकरे गटातील नेते शिंदे गटातील नेत्यांना गद्दार म्हणताना दिसून येतात. आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेते दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. २०१२ ला बाळासाहेबांचे निधन झाले, केसरकर २०१४ ला शिवसेनेत आले मग ते बाळासाहेबांचे हिंदुत्व कधी शिकले? असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन २०१२ मध्ये झाले होते. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये दीपक केसरकर शिवसेनेमध्ये आले. केसरकर नेहमीच बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर भाष्य करत असतात. मग ते हिंदुत्व शिकले कधी? असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
तसेच सुषमा अंधारे यांनी यावेळी शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांच्यावरही टीका केली आहे. सुषमा अंधारे राष्ट्रवादीतून आल्या आहेत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते. त्याला उत्तर देताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी कधीही राष्ट्रवादीची सदस्य नव्हते. तरीही ते म्हणतात की मी राष्ट्रवादीत होते. गुलाबरांवांना आवरा ते महिलांवर कमरेखालचे वार करतात.
सुषमा अंधारे यांनी यावेळी भाजपवरही निशाणा साधला आहे. भाजप कपटी कारस्थान करणारा पक्ष आहे. भाजपने द्वेषमूलक राजकारण केले आहे. हे राजकारण संपवून सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
जर तुझा बाप सुषमा अंधारेचा पती नसता तर तर मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टेजवर बोलावलं असतं का?
lovestory : ७० वर्षीय लियाकतच्या प्रेमात पडली १९ वर्षांची शुमैला; लव्ह स्टोरी वाचून चक्रावून जाल
राष्ट्रवादीला सर्वात मोठा झटका! ‘या’ आमदाराने तडकाफडकी सोडला पक्ष